रशियात आबे आणि मोदी भेट, या विषयावर महत्त्त्वाची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियातील वाल्दोवास्तोक शहराच्या दौऱ्यावर

Updated: Sep 5, 2019, 09:03 AM IST
रशियात आबे आणि मोदी भेट, या विषयावर महत्त्त्वाची चर्चा  title=

नवी दिल्ली : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियातील वाल्दोवास्तोक शहराच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदींनी सकाळीच जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि मलेशियाचे पंतप्रधान महाथेर बिन मोहम्मद यांची भेट घेतली. आबे आणि मोदी यांची मैत्री जुनी असून विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांमध्ये 5 G तंत्रज्ञानावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर, आबे आणि मोदी यांच्या या भेटीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे.

भारत आणि रशियाचा अंतर्गत प्रकरणात कुणी तिसऱ्याने दखल घ्यायची गरज नाही. दोन्ही देशांतील मैत्री वेगाने वाढली आहे.

रशियाची सामग्री भारतात बनेल. तसेच रशियासोबत अनेक करार झाले आहेत. आम्ही आमचे संबंध विविध क्षेत्रांमध्ये नेत असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. 

दोन्ही देशांचे नेते एकमेकांच्या संपर्कात असतात.  दोन्ही देशांमध्ये समुद्री विकासावर करार झाले. कुडनकुलम परमाणू प्लांटचे तिसरे युनिट लवकरच सुरु होईल असे व्लादिमीर पुतिन यांनी यावेळी म्हटले. भारतासोबत आर्थिक आणि सामग्री संबंध आणखी मजबूत करायचे असल्याचे पुतिन यावेळी म्हणाले. 

स्वच्छ सेवा अभियान

येत्या ७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण होत आहेत. गेल्या १०० दिवसात सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये तीन तलाक, अनुच्छेद ३७० रद्द करणे असे काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस असून, त्यानिमित्त स्वच्छ सेवा अभियान राबविण्यात येणार आहे.