Russia-Ukraine Crisis : हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर उद्भवलेल्या संकटाच्या परिस्थितीवर चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, दोन्ही देशांच्या नेत्यांनी तात्काळ युद्धविराम आणि संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर सहमती दर्शविली.
युक्रेन-हंगेरियन सीमेवरून 6,000 हून अधिक भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात मदत केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी ओर्बन आणि हंगेरियन सरकारचे मनापासून आभार मानले.
पीएमओने सांगितले की, युक्रेनमधून परत आणलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना हंगेरीचे पंतप्रधान म्हणाले की, त्यांची इच्छा असल्यास ते हंगेरीमध्ये शिक्षण सुरू ठेवू शकतात.
दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याचे आणि उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन संघर्ष संपवण्यासाठी भर देण्याचे मान्य केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.