Russia Ukraine War : युक्रेननंतर आता उत्तर युरोपमध्ये तणाव वाढला आहे. आर्टिक समुद्राला लागून असलेल्या या प्रदेशात फिनलँड आणि स्वीडनच्या सीमेजवळ रशियाने क्षेपणास्त्र आणि घातक शस्त्रास्त्र तैनात केली आहेत. गेल्या अनेक दशकांपासून फिनलँड आणि स्वीडन ही राष्ट्र तटस्थ राहिली.
अमेरिका आणि रशियाच्या कोणत्याच कंपूत ते सहभागी झाले नाहीत. मात्र आता त्यांना नाटोच्या सदस्यत्वाचे वेध लागलेत. आणि हेच नेमकं कारण आहे पुतीन नाराज होण्याचं...
पुतीनच्या निशाण्यावर फिनलँड, स्वीडन?
फिनलँड, स्वीडन नाटो सदस्यत्व मिळवण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे पुतीन संतापले आहेत. या दोन्ही देशांच्या सीमा रशियाशी जुळतात. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर आता फिनलँडचं धाबं दणाणलं आहे. त्यामुळेच आता फिनलँडने नाटोचा सदस्य लवकरात लवकर व्हावं अशी मागणी जोर धरत आहे. नाटो सदस्यत्व घेण्याचा सरकारचा विचार त्यामुळे आणखी बळकट होत आहे.
आम्ही नाटोचे पार्टनर आहोत पण आता सदस्य झालो तर कलम 5 नुसार आम्हाला नाटोचं संरक्षण मिळू शकेल असं त्यांच्या पंतप्रधानांनी म्हटलंय. त्यामुळेच रशियाने फिनलँडला गंभीर इशारा दिलाय.
रशियाचा फिनलँडला इशारा
फिनलँडने हे पाऊल उचललं तर युरोपातली सुरक्षेचा प्रश्न चिघळेल. यामुळे फिनलँड विध्वंसाच्या आणखी जवळ जाईल.
2014 मध्ये रशियाने क्रिमिया हस्तगत केल्यावर फिनलँड आणि स्वीडन हे आणखी जवळ आले. त्यांनी एकमेकांशी सुरक्षा करारही केला. फिनलँडचं लष्करही चांगल्या तयारीचं आहे. फिनलँडच्या ताफ्यात अमेरिकेची एफ 35 सारखी विमानं आहेत. त्यामुळे खरंच युद्ध पेटलं तर सेंट पीटर्सबर्गला धोका होऊ शकतो. त्यामुळे रशियाने आता फिनलंडविरोधात शड्डू ठोकायला सुरूवात केली आहे.