Nasa's SpaceX Crew-5: एलन मस्क (elon musk) यांच्या SpaceX ने नवा रचला इतिहास रचला आहे. यासोबतच नासाच्या (NASA) टीमने आणखी एक इतिहास रचला आहे. नासाचे स्पेसएक्स मिशन यशस्वी झाले आहे. पाच महिन्यानंतर NASA चे चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. याचा व्हिडिओ नासाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यापूर्वी नासाच्या दोन अंतराळवीरांना स्पेसएक्स कंपनीने अवकाशात पाठवले होते. फाल्कन-9 रॉकेट आणि क्रू ड्रॅगन कॅप्सूलमधून चार अंतराळवीर अवकाशात गेले होते. नासाने एलन मस्क यांच्या SpaceX खाजगी कंपनीच्या माध्यामातून अंतराळवीर अवकाशात पाठवले. शनिवारी रात्री उशिरा हे अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत.
अंतराळवीरांना घेवून अवकाशात झेपावलेले ड्रॅगन कॅप्सूल शनिवारी रात्री उशिरा पृथ्वीवर परतले आहे. ड्रॅगन कॅप्सूल फ्लोरिडा किनाऱ्यापासून मेक्सिकोच्या आखातात उतरली. पॅराशूटच्या मदतीने हे अंतराळवीर समुद्रावर उतरले. NASA च्या SpaceX Crew-5 मिशनमध्ये NASA फ्लाइट कमांडर निकोल औनापू मान ज्या अंतराळातील पहिली मूळ अमेरिकन महिला आहेत. NASA पायलट जोश कसाडा (वय 49), जपानी अंतराळवीर कोइची वाकाटा ( वय 59) आणि रोकोस्मोसचे कॉस्मोनॉट अन्ना किकिना हे चार आंतराळवीर सहभागी झाले होते.
तब्बल 157 दिवस हे चार अंतराळवीर अवकाशात होते. हार्ट मसल टिश्यू, मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मानवी पेशी व टिश्यू प्रिंट करणाऱ्या बायोप्रिंटर तसेच औषध उत्पादनाच्या तंत्रज्ञानावरही संशोधन केले.
5 ऑक्टोबर 2022 रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून SpaceX फाल्कन 9 रॉकेट अवकाशात झेपावले होते.
2002 मध्ये एलन मस्क यांनी SpaceX ही कंपनी सुरु केली. स्पेस टूरीजम सुरु करणे हे या कंपनीचे मुख्य उद्दीष्ट आहे. या कंपनीच्या माध्यमातून रियुजेबल रॉकेट लाँच सिस्टीम तयार करण्यात आली आहे.
Splashdown!#Crew5 is back on Earth, completing a science mission of nearly six months on the @Space_Station. Their @SpaceX Dragon Endurance spacecraft touched down at 9:02pm ET (0202 UTC March 12) near Tampa off the coast of Florida. pic.twitter.com/nLMC0hbKY4
— NASA (@NASA) March 12, 2023