'सुपर अँटीबॉडी' असणारा व्यक्ती ज्याला कोरोनाही घाबरतो, संशोधकांमध्ये कुतुहल

खुद्द कोरोना व्हायरसच ज्याला घाबरतो.

Updated: Mar 16, 2021, 07:50 PM IST
'सुपर अँटीबॉडी' असणारा व्यक्ती ज्याला कोरोनाही घाबरतो, संशोधकांमध्ये कुतुहल title=

मुंबई : कोविड 19 व्हायरसनं सगळ्या जगाला वेढलं आहे. त्याचे वेगवेगळे स्टेन्स ददरोज सापडत आहेत आणि मग ते किती डेंजर आहेत, याची चर्चा होते. मात्र एक जण असा आहे की त्याला खुद्द कोरोना व्हायरसच घाबरतो. कोण आहे तो ?

जॉन हॉसिल असं त्या व्यक्तीचं नाव आहे. सगळ्या जगाला हैराण करणारा कोरोना व्हायरस त्यांना प्रचंड घाबरतो. त्यांच्या आसपासही फिरकायची कोरोनाची हिंम्मत नाहीये. कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. जॉन यांच्याकडे आहे 'सुपर अँटीबॉडी...' होय. कोरोनाच्या कोणत्याही स्ट्रेनशी दोन हात करण्याची क्षमता त्यांच्यापाशी आहे. 

जॉन यांच्या या सुपर पॉवरची कथाही मजेशीर आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये ते मुलासह युरोपला गेले होते. त्यानंतर त्यांना थोडी कणकण जाणवली. तेव्हा साधी अॅलर्जी असेल, असं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. मात्र काही आठवड्यांतच त्यांचा रूममेट कोरोना पॉझिटीव्ह झाला. त्याची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे जॉन यांचं धाबं दणाणलं. त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यावेळी केलेल्या चाचण्यांमधून त्यांच्या शरिरात सुपर अँटीबॉडी असल्याचं समोर आलं.  

विशेष म्हणजे जॉन यांच्या अँटीबॉडीज् एवढ्या स्ट्राँग आहेत, की त्या 10 हजार पट डायल्यूट केल्या, तरी त्या व्हायरसशी टक्कर देऊ शकतात. त्यामुळे आता या अँटीबॉडी वापरून व्हॅक्सिन तयार करता येऊ शकतं का, यावर संशोधन सुरू आहे. 

कोणत्याही रेस्पिरेटरी व्हायरसशी दोन हात करण्याची या सुपर व्हायरसची क्षमता आहे... कोविड-19 येवो की आणखी कुणी... जॉन यांच्या अँटीबॉडीज् बिलकुल घाबरत नाहीत.