Coronavirus : 'रक्त गोठण्या'च्या तक्रारीनंतर, या पाच देशांनी या व्हॅक्सिनवर घातली बंदी

अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) या व्हॅक्सिनबाबत काही तक्रारी आल्या आहेत. यात प्रामुख्याने लस घेतल्यानंतर रक्त गोठणे याचा समावेश आहे. 'रक्त गोठण्या'च्या तक्रारीनंतर, पाच देशांनी या वॅक्सिनवर घातली बंदी घातली आहे.

Updated: Mar 16, 2021, 11:02 AM IST
Coronavirus : 'रक्त गोठण्या'च्या तक्रारीनंतर, या पाच देशांनी या व्हॅक्सिनवर घातली बंदी  title=

बर्लिन : जगभरात कोरोना विषाणूचा धोका वाढला आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण करण्यावर अनेक देशांनी भर दिला आहे. मात्र, काही ठिकाणी कोरोना लसबाबत अनेक तक्रारी येत आहेत. अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) या व्हॅक्सिनबाबत काही तक्रारी आल्या आहेत. यात प्रामुख्याने लस घेतल्यानंतर रक्त गोठणे याचा समावेश आहे. 'रक्त गोठण्या'च्या तक्रारीनंतर, पाच देशांनी या वॅक्सिनवर घातली बंदी घातली आहे. यात जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेन  (Germany, France, Italy and Spain) यांचा समावेश आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) कोरोना लसीनंतर (Corona Vaccine) रक्ताच्या गाठी (Blood Clot) झाल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन लसीकरण थांबविण्यात आले आहे. या व्हॅक्सिनच्या वापरास तात्पुरती बंदी घातली आहे. यापूर्वी आयर्लंडने बंदी घातल्याचा निर्णय घेतला होता. तथापि, अ‍ॅस्ट्राझेनेका आणि जागतिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. इटलीने यासंदर्भात एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, अन्य युरोपियन देशांनी घेतलेल्या पावलानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Emmanuel Macron ने सांगितले की...

इटलीच्या उत्तर पायमोंट प्रदेशातील 57 वर्षीय शिक्षकास शनिवारी लसीकरण करण्यात आले आणि रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्याच वेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) म्हणाले की खबरदारी म्हणून अ‍ॅस्ट्राझेनेका वापरण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ते म्हणाले की युरोपियन मेडिसीन एजन्सीने मत न दिल्यास ही बंदी किमान मंगळवारी दुपारपर्यंत सुरू राहील.

 AstraZenecaने सांगितले सुरक्षित लस 

तज्ज्ञांनी लसीच्या सुरक्षेचा आढावा घेईपर्यंत दोन आठवड्यांपर्यंत ही लस वापरणे थांबवत असल्याचे स्पेनने म्हटले आहे. दुसरीकडे जर्मनीनेही सोमवारी सांगितले की रक्ताच्या गाठी झाल्यानंतर अ‍ॅस्ट्राझेनेकाचा वापर सध्या बंद करण्यात आला आहे. जर्मनी हा युरोपमधील सर्वात मोठा देश आहे. ज्याने या लसीवर बंदी घातली आहे. तर कंपनीचे म्हणणे आहे की त्याची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाकडून एक निवेदन जारी केले आहे की, त्यात असे म्हटले आहे विविध देशांमध्ये 17 दशलक्षाहून अधिक लोकांना लसीकरण करण्यात आले आहे आणि केवळ रक्तस्त्राव होण्याच्या 37 रिपोर्ट आले आहेत. कंपनी पुढे म्हणाली की या लसीमुळे रक्त गोठण्याचा धोका वाढतो, असे कोणतेही पुरावे नाहीत.

गुरुवारी आढावा बैठक 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) आणि युरोपियन संघाच्या युरोपियन मेडिसीन एजन्सीनेही कंपनीच्या या दाव्याचे समर्थन केले आहे. सध्याच्या आकडेवारीमुळे रक्त गोठणे आणि लसीकरण यांच्यात काही संबंध आहे, हे सूचित होत नाही. दरम्यान, युरोपियन युनियनच्या ड्रग नियामक एजन्सीने अ‍ॅस्ट्राझेनेका विषयी तज्ज्ञांच्या निष्कर्षांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी बैठक बोलावली आहे. कोरोना 9 पासून संरक्षणासाठी अ‍ॅस्ट्राझेनेकासह ऑक्सफोर्ड लस सुरक्षित असल्याचे ब्रिटीश स्वीडिश फार्मास्युटिकल कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेका आणि यूके औषध नियामक यांनी म्हटले आहे.

आयर्लंडने यापूर्वीही बंदी घातली 

यापूर्वी, नॉर्वेमध्ये अ‍ॅस्ट्राझेनेका लसीकरणानंतर रक्त गोठण्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर आयर्लंडने तात्पुरती बंद घातली आहे. आयर्लंडचे उप-मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रोनन ग्लेन यांनी सांगितले की नॉर्वेच्या मेडिसिन्स एजन्सीच्या म्हणण्यानुसार अ‍ॅस्ट्राझेनेका लसीनंतर प्रौढांमधे रक्त गोठण्याची चार प्रकरणे आढळली, त्यानंतर ती थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नेदरलँड्सनेही या लसीचा वापर बंद केला आहे.