रिव्हेंज पॉर्न, सायबर फ्लॅशिंग हा गुन्हा, दोषींसाठी शिक्षेची तरतूद

दिवसेंदिवस फोफावत चाललेल्या तंत्रज्ञामुळे आणि सोशल मीडियाच्या लोकप्रियतेमुळे 'रिव्हेंज पॉर्न' जगभरात डोकेदुखी बनलंय

Updated: May 8, 2019, 02:08 PM IST
रिव्हेंज पॉर्न, सायबर फ्लॅशिंग हा गुन्हा, दोषींसाठी शिक्षेची तरतूद  title=

सिंगापूर : सिंगापूरमध्ये आपल्या पूर्व-जोडीदारांद्वारे एकमेकांच्या संमत्तीशिवाय खाजगी क्षणातील फोटो किंवा व्हिडिओ इंटनेटवर अपलोड करणं अर्थात 'रिव्हेंज पॉर्न' आणि इंटरनेटद्वारे कोणाच्याही गुप्तांची अश्लील फोटो दुसऱ्यांना पाठवणं अर्थात 'सायबर फ्लॅशिंग' या दोन्हीही कृती बेकायदेशीर घोषित करण्यात आल्यात. या गुन्ह्यासाठी दोषींना शिक्षाही सुनावली जाणार आहे. 

दिवसेंदिवस फोफावत चाललेल्या तंत्रज्ञामुळे आणि सोशल मीडियाच्या लोकप्रियतेमुळे 'रिव्हेंज पॉर्न' जगभरात डोकेदुखी बनलंय. अनेक देशांतील सरकारनं याविरुद्ध कठोर कायदे बनवले आहेत. असाच कायदा बनवणाऱ्या देशांमध्ये आता सिंगापूरचाही समावेश झालाय. 

सिंगापूरच्या संसदेनं सोमवारी आपल्या संसदेत एक विधेयक संमत केलंय. यामध्ये खाजगी फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करणं किंवा तसं करण्याची धमकी देणं हा गुन्हा असल्याचं मानण्यात आलंय. या गुन्ह्यासाठी दोषी आढळलेल्या व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय दंडही भरावा लागू शकतो.

'सायफर फ्लॅशिंग'च्या दोषीला कमीत कमी एका वर्षाची शिक्षा किंवा दंडाची शिक्षा दिली जाऊ शकते. अश्लील फोटो प्राप्त करणाऱ्याचं वय १४ वर्षांहून कमी आहे तर हे फोटो पाठवणाऱ्या दोषीला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय दंडासहीत फटकेही खावे लागू शकतात.