पंतप्रधानांनी राजीनामा देताच ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी या भारतीयाचं नाव पुन्हा चर्चेत

दुसऱ्या पंतप्रधानाने देखील राजीनामा दिल्याने देश पुन्हा एकदा संकटात. कोण असेल सत्ताधाऱ्यांचा नवा चेहरा.

Updated: Oct 22, 2022, 09:09 PM IST
पंतप्रधानांनी राजीनामा देताच ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी या भारतीयाचं नाव पुन्हा चर्चेत title=

लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस (britain PM liz truss resign) यांनी राजीनाम्याची घोषणा केल्याने ब्रिटन पुन्हा नेतृत्वाच्या संकटात सापडला आहे. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळाला पण त्यांनी पण राजीनामा दिल्यानंतर आता नवं संकट देशापुढे उभं आहे. पण लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर बोरिस जॉन्सनही (boris johnson) सक्रिय झालेत. 2023 ची सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने आता सत्ताधारी पक्षाने तयारी सुरु केली आहे. पण त्याआधी त्यांना नेतृत्व करणारा शोधावा लागणार आहे. 24 ऑक्टोबरला पहिले मतदान होणार असून, ज्या उमेदवाराला पक्षाच्या 100 खासदारांचा पाठिंबा मिळेल, तो पंतप्रधानपदासाठी दावेदार असणार आहे. (Who will become new prime minister of Britain)

लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर बोरिस जॉन्सन, ऋषी सुनक (rishi sunak) आणि पेनी मॉर्डेंट यांची नावे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. बोरिस जॉन्सन यांनी 2019 च्या निवडणुकीत टोरी पक्षाला 80 जागांवर विजय मिळवून बहुमत मिळवून दिले होते.

कोरोना महामारीच्या काळात ऋषी सुनक (rishi sunak) यांनी ब्रिटनची अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे हाताळली. कोरोनाच्या वेळी ब्रिटनमध्ये ऋषी सुनक यांच्या लोकप्रियता वाढली. पंतप्रधानपदाच्या संदर्भात तिसरे नावही चर्चेत आहे. पण ज्यांना 100 खासदारासांचा पाठिंबा मिळेल तेच पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येऊ शकतील.

प्रत्येक संभाव्य उमेदवार शंभर खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सुमारे दीड महिन्यापूर्वी बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. तेव्हा ऋषी सुनक (rishi sunak) यांना 120 हून अधिक खासदारांचा पाठिंबा मिळाला होता. मात्र, लिझ ट्रस यांनी सदस्यांची मते जिंकली.

ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदाच्या निवडणुकीतील उमेदवारीबाबत आतापर्यंत काहीही सांगितलेले नाही. त्यांना आधीच शंभर खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा ऋषी सुनक कॅम्पने केला आहे. खासदारांमध्ये झालेल्या मतदानात ऋषी सुनक (rishi sunak) पहिल्या क्रमांकावर होते. यामुळे त्याचा दावाही मजबूत होतो.

पार्टीगेट घोटाळ्याच्या चौकशीत बोरिस जॉन्सन हे कोरोनाचे नियम मोडून संसदेत खोटे बोलल्याबद्दल दोषी आढळले तर त्यांना पंतप्रधानपदाची खुर्ची सोडावी लागेल. अशा स्थितीत टोरी पक्ष आणि ब्रिटन पुन्हा त्याच स्थितीत पोहोचतील ज्या स्थितीत ते आता आहेत. त्यामुळे बोरिस यांना उमेदवारी देणार का हा देखील एक प्रश्न आहे.