मुंबई: तुम्ही आतापर्यंत अनेकदा द्राक्षं खाल्ली असतील. मात्र किती रुपये किलोची द्राक्ष खाल्ली असतील? ५०, १००, २०० रुपये किलोपर्यंतच्या द्राक्षांचा स्वाद घेतला असेल. मात्र केवळ एक द्राक्ष ३५ हजार रुपयांचं खाणं तर दूर पण कधी पाहिलंय तुम्ही? ऐकून धक्का बसला ना पण अहो असं द्राक्ष आहे. खास दुर्मीळ जातीच्या द्राक्षाची लागवड केली जाते. एका द्राक्षांची किंमत 35 हजार रुपये आहे.
रुबी रोमन ग्रेप्स असं या द्राक्षाचं नाव आहे. ही द्राक्षांची अत्यंत दुर्मीळ प्रजाती आहे. दरवर्षी रुबी रोमनचे केवळ २ हजार ४०० घोसांचं उत्पादन घेतलं जातं. पिंगपाँग बॉलएवढ्या प्रत्येक द्राक्षाचं वजन २० ग्रॅम असतं इतकच नाही तर 3 सेमी पर्यंत या द्राक्षाचा आकार असू शकतो असा दावा आहे.
या द्राक्षाच्या गुणवत्तेची पूर्ण गॅरेंटी असते. २००८ मध्ये संशोधन करून नव्या प्रीमियम द्राक्षांचं वाण विकसित करण्यात आलं आहे. 14 वर्षांची गुंतवणूक आणि संशोधनाचं गोड फळ म्हणजे हे रुबी रोमन द्राक्षाचं खास वैशिष्ट्यं आहे.
या द्राक्षाचा एक लहानसा घोस साडेसात लाखांच्या घरात जातो. बाजारपेठेत फळ विक्रीसाठी येतं, तेव्हा त्याला सर्टिफाय करण्यात येतं. त्यासाठी खास नियमही तयार करण्यात आलेत. काही दिवसांपूर्वी जगातल्या सर्वात महागडा आंबा आम्ही दाखवला होता. मात्र फळांच्या राजापेक्षाही या रुबी रोमनचा रुबाब कैक पटींनी जास्त आहे.