Russian Jet Dumps Fuel On US Drone : रशिया आणि अमेरिका यांच्यात सध्या तणाव निर्माण झाला आहे. (US Drone) अमेरिकेचं टेहळणी ड्रोन एमक्यू 9 हे रशियाने पाडल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला आहे. त्याबाबतचा व्हिडिओच अमेरिकेने जारी केला आहे. (Russia shoots down US drone in Black Sea) काळ्या समुद्रावर हद्दीत अमेरिकेचं MQ-9 हे ड्रोन घिरट्या घालत असताना असताना रशियाच्या SU-27 या विमानाने ड्रोनवर आता इंधन टाकलं, त्यानंतर दुस-या विमानाने अगदी जवळून धडक देत ड्रोनच्या पात्यांना धक्का लावला. त्यामुळे ड्रोन निकामी होऊन समुद्रात पडले, असा दावा अमेरिकेचा आहे.
अमेरिकेने 42 सेकंदांचा व्हिडिओ जारी करुन हे आरोप केलेत. मात्र आपल्या लढाऊ विमानांनी हे ड्रोन खाली पाडलं नाही असा दावा रशियाने केला. या ड्रोनचे अवशेष मिळवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे रशियाने म्हटले आहे. अमेरिका आणि रशिया हे एकमेकांच्या हेरगिरीच्या कामात वारंवार असे अडथळे आणतातच. पण युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या वादाला महत्त्व आलंय. या घटनेचं गांभीर्य ओळख अमेरिका आणि रशियाच्या वरिष्ठ संरक्षण आणि लष्करी अधिकाऱ्यांनी चर्चा केली.
रशियन लढाऊ विमानाने मंगळवारी काळ्या समुद्रात अमेरिकन ड्रोनवर इंधन टाकले आणि नंतर त्याच्याशी टक्कर घडवून आणली. ज्यामुळे ड्रोन क्रॅश झाले, असे अमेरिकेने म्हटले आहे. यूएस युरोपियन कमांडने सांगितले की, दोन रशियन Su-27 लढाऊ विमानांनी मानवरहित MQ-9 ड्रोनला समुद्रात पाडले. ड्रोनवर धडक करण्यापूर्वी Su-27s ने इंधन टाकले आणि MQ-9 पाडले गेले, असा दावा अमेरिकेचा आहे. रशिया - युक्रेन युद्धामुळे आधीच तणाव आहे. त्यात आता अमेरिकेने रशियावर आरोप केल्याने या तणावात अधिक भर पडली आहे. रशिया आणि अमेरिका यांची विमाने येथे अनेकदा उड्डाण करत असतात; परंतु दोन्ही विमाने समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेने म्हटलेय, रशियाच्या एस्यू-27 या दोन लढाऊ विमानांनी त्यांच्या ड्रोनला धडक देऊन काळ्या समुद्रात पाडले. अमेरिकेच्या हवाई दलाचे जनरल जेम्स हॅकर यांनी रशियाची कृती अत्यंत गंभीर आणि चुकीची असल्याची म्हटले आहे.
दरम्यान, रशियाने ड्रोन पाडल्याचा इन्कार केला आहे. त्याचवेळी आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्या लढाऊ विमानांनी 15 मार्चला अमेरिकेचे ड्रोन ‘एम्क्यू-९’ पाडले, असा आरोप अमेरिकेने केला आहे, तो चुकीचा आहे. रशियाची विमाने आणि अमेरिकी ड्रोन काळ्या समुद्रावर घिरट्या घालत असतांना ही घटना घडल्याचे अमेरिकने म्हटले आहे. तथापि आम्ही अमेरिकेचे कुठलेही ड्रोन पाडले नसल्याचा खुलासा रशियाने केला आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे भविष्यात युद्ध परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता आहे.