कीव : Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्या युद्ध सुरु झाल्याला आज पाचवा दिवस आहे. एक-दोन दिवसात युद्ध संपेल अशी शक्यता होती. ( Russia Ukraine Conflict) मात्र, युक्रेनने चोख प्रत्युत्तर देत रशियाला जोरदार टक्कर दिली आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधीनी कीव शहरात घुसले असले तरी जोरदार लढा युक्रेन सैन्याकडून देण्यात येत आहे. दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मोठा निर्णय घेतला आहे. रशियाविरुद्धच्या लढाईत सभागी होण्यास इच्छुक असल्यास युक्रेन लष्करी अनुभव असलेल्या कैद्यांची सुटका करेल, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. (Ukraine took tbig decision, Volodymyr Zelensky says Ukraine will release prisoners with military experience if willing to join fight against Russia)
तर दुसरीकडे युक्रेनला अन्य देशांकडून मदत करण्यात येत आहे. नोटोमधील देशांनी पुढाकार घेतला आहे. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांनी मदत जाहीर केले आहे. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी सांगितले की, मित्र राष्ट्र युक्रेनला हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे, टँकविरोधी शस्त्रे, तसेच मानवतावादी आणि आर्थिक मदत देऊन समर्थन वाढवत आहेत. याबातचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
Ukraine's President Volodymyr Zelensky says Ukraine will release prisoners with military experience if willing to join fight against Russia: Reuters #RussiaUkraineConflict pic.twitter.com/Ezhb1lviVs
— ANI (@ANI) February 28, 2022
त्याचवेळी बेलारुसमध्ये युक्रेन-रशियामध्ये शांती चर्चा सुरु झाली आहे. असे असताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात रशियन सैनिकांना आवाहन केले आहे, 'तुमचे जीव वाचवा आणि निघून जा'
Ukraine's President Volodymyr Zelensky appeals to Russian soldiers in speech - "Save your lives and leave": Reuters #RussiaUkraineConflict pic.twitter.com/EYswZ2Mq6f
— ANI (@ANI) February 28, 2022