रशिया-युक्रेन युद्धावर पुतिन यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले भारताच्या सल्ल्याने...

पाश्चात्य देशांचा प्रचंड दबाव असतानाही भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर रशियाच्या कारवाईला विरोध केलेला नाही. एवढेच नाही तर भारताने या काळात रशियाकडून तेल खरेदीही वाढवली आहे.

Updated: Oct 15, 2022, 08:40 PM IST
रशिया-युक्रेन युद्धावर पुतिन यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले भारताच्या सल्ल्याने... title=

नवी दिल्ली : रशिया विरुद्ध युक्रेन (Russia vs ukraine) युद्धाने जगाच्या चिंता वाढवल्या आहेत. काही देश हे युक्रेन तर काही देश हे रशियाच्या बाजुने उभे राहिले. पण भारताची भूमिका तटस्थ होती. भारताने दोन्ही देशाच्या नेत्यांना शांततेचं आव्हान केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Putin) यांना काही दिवसापूर्वी दिलेला सल्ला कामी आला आहे. भारत आणि चीनला युक्रेनच्या समस्येवर संवादातून तोडगा काढायचा आहे, असे पुतीन यांनी म्हटले आहे. समस्या सोडवण्यासाठी रशिया तयार आहे पण युक्रेन त्यासाठी तयार नाही. साडेसात महिन्यांपासून सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम अनेक देशांवर झाला आहे.

सप्टेंबरमध्ये उझबेकिस्तानमध्ये झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांची भेट घेतली होती. या भेटीत पीएम मोदी यांनी पुतिन यांना सांगितले होते की, ही युद्धाची वेळ नाही. या भेटीत मोदींनी युक्रेन समस्येवर चर्चेतून तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता. नंतर मोदींनी हाच सल्ला युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना फोनवर दिला होता. पुतिन यांनी सोमवारी कझाकस्तानमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याचा उल्लेख केला.

भविष्यात युक्रेनने आणखी कोणतेही दहशतवादी कृत्य केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, तसेच काळ्या समुद्रातून अन्न पुरवठ्यासाठी दिलेला प्रवेशही रोखला जाईल, असे पुतीन म्हणाले. युक्रेनकडे जाणारा सागरी मार्ग अनेक महिने बंद ठेवल्यानंतर रशियाने जुलैमध्ये संयुक्त राष्ट्र आणि तुर्कस्तानच्या मध्यस्थीने काळ्या समुद्राचा मार्ग खुला करण्याचे मान्य केले. एका प्रश्नाला उत्तर देताना पुतिन यांनी युक्रेनमध्ये कोणतीही तत्काळ मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारली. युक्रेनच्या कारवाया पाहून पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय आहे की सोमवार आणि गुरुवारी रशियाने युक्रेनमध्ये मोठे हवाई हल्ले केले होते. दुसर्‍या प्रश्नाच्या उत्तरात, पुतिन यांनी युक्रेनमधील लष्करी कारवाईबद्दल कोणताही पश्चात्ताप किंवा संकोच असल्याचे नाकारले होते.

तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष तय्यप एर्दोगन यांनी कैद्यांच्या अदलाबदलीतील भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, त्यांच्या आदेशानुसार 300,000 अतिरिक्त सैनिकांची भरती दोन आठवड्यात पूर्ण केली जाईल. पुतिन म्हणतात की रशियाबरोबर नाटो सैन्यांमधील कोणत्याही थेट संघर्षाचा परिणाम "जागतिक आपत्ती" होईल. मला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी वाटाघाटी करण्याची 'गरज नाही'. पुढील महिन्यात इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या ग्रुप ऑफ 20 शिखर परिषदेत सहभागी होण्याचे त्यांनी अद्याप ठरवलेले नाही.

बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी पाश्चात्य देशांना रशियाला जागतिक व्यवस्थेपासून बाजूला करण्याच्या प्रयत्नांचा इशारा दिला आहे. म्हणाले, रशियाकडे अण्वस्त्रांचा प्रचंड साठा आहे आणि तो साठा एका खास कारणासाठी तयार करण्यात आला आहे, हे विसरू नये. बेलारूसमध्ये 28 वर्षांपासून सत्तेत असलेले लुकाशेन्को हे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे खास मित्र मानले जातात.

युक्रेनमध्ये रशियन अण्वस्त्र हल्ल्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नाटो सदस्य देशांच्या सैन्याने बेल्जियम, उत्तर समुद्र आणि इतर अनेक ठिकाणी आण्विक स्ट्राइक आणि प्रतिबंधक कवायती केल्या आहेत. या सरावात अमेरिकेच्या अत्याधुनिक B-52 बॉम्बर्ससह एकूण 60 विमाने सहभागी होणार आहेत.