जगातील सर्वात युवा पंतप्रधान, वय अवघं ...

सना मरीन या फिनलंडच्या नव्या पंतप्रधान आहेत. सना मरीन या अवघ्या ३४ व्या वर्षाच्या आहेत

Updated: Dec 9, 2019, 09:59 PM IST
जगातील सर्वात युवा पंतप्रधान, वय अवघं ... title=

हेलसिंकी : सना मरीन या फिनलंडच्या नव्या पंतप्रधान आहेत. सना मरीन या अवघ्या ३४ व्या वर्षाच्या आहेत, तरी देखील त्यांनी ही जबाबदारी पेललीय. फिनलंडमध्ये सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे सरकार आलं आहे. 

सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या सना मरीन या जगातल्या सध्याच्या सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत. त्या अवघ्या २७ व्या वर्षी महापौर होत्या. फिनलंडमध्ये पाच पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे.

विशेष म्हणजे फिनलंडमध्ये महिलांचा राजकीय क्षेत्रातला सहभाग लक्षणीय आहे. सध्या पाच पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. त्यामधल्या तीन पक्षांच्या प्रमुख या महिला आहेत. 

१९०७ साली फिनलंडच्या संसदेत महिला लोकप्रतिनिधींचं प्रमाण फक्त साडे नऊ टक्के होतं. आता फिनलँडच्या संसदेत ४७ टक्के महिला लोकप्रतिनिधी आहेत.