धक्कादायक! नेटफ्लिक्सवरील मालिका पाहून १२ वर्षीय मुलीची आत्महत्या

'13 reasons why' या नेटफ्लिक्सवरील मालिकेमुळे तिने आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा

Updated: May 6, 2019, 04:37 PM IST
धक्कादायक! नेटफ्लिक्सवरील मालिका पाहून १२ वर्षीय मुलीची आत्महत्या title=

नवी दिल्ली : अमेरिकेमध्ये नेटफ्लिक्सवरील मालिका पाहून एका १२ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ वर्षीय मुलगी जेसिका स्कॅटरसनने अमेरिकेत आपल्या राहत्या घरी बाथरुममध्ये फाशी लावून आत्महत्या केली. '13 reasons why' या नेटफ्लिक्सवरील मालिकेमुळे तिने आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. 



१२ वर्षीय मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी एक नोट लिहिली आहे. ज्यात तिने तिच्या आत्महत्येची ६ कारणं लिहिली आहेत. जेसिकाच्या आईने ती ही मालिका पाहत होती आणि त्यानंतर तिची वागणूक अचानक बदलल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेसिका तिच्या शाळेतील मित्रांमुळे तणावात होती आणि ही मालिका पाहून तिच्याकडे आत्महत्येचा एकच पर्याय दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जेसिकाच्या खोलीमध्ये आत्महत्या करणाऱ्या एका मुलीचा फोटोही आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आधीपासूनच या मालिकेबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. मालिकेविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती.  '13 reasons why' मालिकेत युवकांना नैराश्य आणि त्यातून आत्महत्येच्या गोष्टी दाखवल्या जातात. यापूर्वीही  '13 reasons why' ही मालिका पाहून काही जणांनी आत्महत्या केली होती. आता पुन्हा मालिकेमुळे १२ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याने ही मालिका बंद करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.