सिग्नल मॅनला ६० लाख वार्षिक पगार, फोटोत सर्वात व्यस्त स्टेशनवर झोपलेला दिसला...

सिग्नल मॅनच्या (Signalman) हातात अनेकांचं आयुष्य असतं.  

Updated: Feb 2, 2022, 08:22 PM IST
सिग्नल मॅनला ६० लाख वार्षिक पगार, फोटोत सर्वात व्यस्त स्टेशनवर झोपलेला दिसला... title=

मुंबई : सिग्नल मॅनच्या (Signalman) हातात अनेकांचं आयुष्य असतं. प्रवाशांचा जन्म-मृत्यू हा सिग्नॅल मॅनच्या हातात असतो असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र सोशल मीडियावर (Social Media) एक असा फोटो व्हायरल झालाय, ज्यामुळे अनेकांची झोप उडाली. हा फोटो ब्रिटनच्या दुसऱ्या क्रमांकाच्या गजबजलेल्या स्थानकाचा आहे. व्हायरल फोटोमध्ये सिग्नलमन आपल्या केबिनमध्ये झोपलेला दिसून आला. इतकी महत्त्वाची जबाबदारी असताना ऑन ड्युटी झोपा काढणं हे हलगर्जीपणा आणि प्रवाशांच्या जीवासोबत खेळण्यासारखंच आहे.  (signalman who controlling trains in britain who found slepping at work) 

The Sun ने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटेनमधील लंडन व्हीक्टोरिया हे सर्वाधिक गर्दी असलेलं दुसरं स्थानक आहे. या स्थानकावरील रेल्वे नियंत्रित करणारा सिग्नलमॅन झोपताना आढळून आला. ऑन ड्युटी झोपलेल्या स्थितीत आढळल्याने या सिग्नल मॅनच्या पाठी तपासाचा ससेमिरा लावण्यात आला आहे. 

हा फोटो जुलै महिन्यातील आहे. हा फोटो नेमक्या कोणत्या तारखेला काढण्यात आला हे निश्चित नाही. मात्र सकाळी साडे तीनच्या दरम्यान काढण्यात आला आहे.  सुदैवाची बाब म्हणजे रात्रीची वेळ असल्याने रेल्वेसेवा बंद होती, यामुळे मोठा अनर्थ टळला.  

वर्षाला 60 लाख रुपये पगार

सिग्नन मॅनच्या केबिनमध्ये किमान 5 कर्मचारी कार्यरत असतात. यांच्यावर आवाज आणि दिशा नियंत्रित करण्याची जबाबदारी असते. या जबाबदारीच्या कामासाठी या कर्मचाऱ्यांना वार्षिक 60 लाख रुपये पगाप मिळतो. मात्र यामधील कर्मचारी झोपलेल्या स्थितीत आढळून आला. तर कहर म्हणजे काही कर्मचारी हे डेस्कवर पाय ठेवून होते.     

या कर्मचाऱ्यांचं कामहे सिग्नल आणि पॉइंटसेवा निंयत्रिण करणं असतं. एखाद्या पेचात्मक आणि आव्हानात्मक स्थितीत सिग्नलमॅनला ड्रायव्हर (मोटरमॅन तसेच लोको पायलट) यांच्याशी संवाद साधायचा असतो. 

दररोज 736 रेल्वेंची ये-जा

या रेल्वे स्थानकावरुन दररोज सरासरी 736 रेल्वे ये-जा करतात.  2019-2020 मध्ये 73.5 लाख प्रवाशांना या रेल्वे स्थानकावरुन ये जा केली.