Solo Trip Tips : सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे काही लोकांना एकटं फिरायला आवडतं. सोलो ट्रॅव्हलिंग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा अनुभव असतो. ज्या लोकांना जगापासून दूर जात स्वतःला थोडा वेळ द्यायचा असतो ते लोक मोठ्या प्रमाणात सोलो ट्रॅव्हल करतात. एकट्यानं प्रवास करण्याचा प्लॅन हा नक्कीच चांगला आहे. कारण त्यात कोणाचं टेन्शन नसतं. कोणाची जबाबदारी नसते. कारण काही झालं तरी आपल्याला आपली कपॅसिटी ही माहित असते अशात जर आपण कोणासोबत असू तर मग आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागते. पण त्यात जर एक मुलगी एकटी फिरायला जात असेल तर यावेळी तिला स्वत: च्या सुरक्षेकडे लक्ष देणे पण खूप महत्त्वाचे असते. सोलो ट्रिप काढताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या ते जाणून घेऊया...
आजकाल मुली फक्त भारत नाही तर परदेशातही एकट्या फिरतात. आजकाल मुलींना सोलो ट्रिप करण प्रचंड आवडतं. जगभरातील अनेक महिला आहेत ज्या लग्नानंतरही एकतरी सोलो ट्रिप दरवर्षी करतात. पण काही महिलांना सोलो ट्रिप काढायची असते पण त्यासाठी कसं काय सगळं करावं हे कळत नाही. ते सगळं कसं करायचं हे जाणून घेऊया...
डेस्टिनेशची घ्या योग्य माहिती
ज्या ठिकाणी तुम्ही एकट्यानं फिरायला जाणार आहात त्या ठिकाणची योग्य माहिती जाणून घ्या. त्या ठिकाणचे लोक कसे आहेत. तिथल्या परंपरा आणि तिथले नियम हे सगळं जाणून घ्या. त्यावरून त्या ठिकाणी तुम्ही एकट्या प्रवास करू शकतात का याची जाणीव तुम्हाला होऊ शकते. याचाच अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी जायला आवडेल की नाही हे तुम्हाला कळेल.
ते ठिकाण सुरक्षित आहे की नाही
तुम्ही ज्या ठिकाणी भेट देणार आहात तिथे पोहोचल्यानंतर हॉटेल बुक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्या. तुम्ही जिथे राहण्याचा विचार करत आहात त्या हॉटेलविषयी ऑनलाइन खूप रिसर्च करा. त्या हॉटेलमध्ये 24 सिक्योरिटीची फॅसिलिटी आहे की नाही, कॅमेरे आहेत की नाही हे तपासून पाहा.
हेही वाचा : तुम्हाला Matte Lipstick काढताना त्रास होतो? मग 'या' टिप्स वापरा
काळजी घ्या
आपल्या सभोवतालच्या वातावरणाबद्दल नेहमी सतर्क राहण्याचा प्रयत्न करा. प्रवासादरम्यान, जिथे कोणी नाही किंवा जंगल परिसरातून जाऊ नका. नेहमी रस्त्याला धरून चालत रहा. विशेषतः रात्री प्रवास करू नका. तुमच्या सभोवतालच्या लोकांकडेही लक्ष देण्याचा प्रयत्न करा. तसेच असुरक्षिततेचे वातावरण नसेल अशी वाहतूक निवडा. याशिवाय तुम्हाला मूलभूत स्वसंरक्षण माहित असले पाहिजे.
आपल्या घरातल्या लोकांच्या संपर्कात रहा
तुम्ही कधी कुठे जात आहात आणि त्यानंतर कोणत्या गाडीनं प्रवास करणार आहात. या सगळ्याची काळजी घ्या. ती माहिती घरच्यांना देत रहा.
स्थानिकांशी मिसळणे
जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जाणार असाल तर सुरक्षिततेचा उत्तम मार्ग म्हणजे तेथील स्थानिक लोकांमध्ये मिसळणे. यासाठी तिथल्या लोकांसारखा ड्रेस परिधान करा. आपण परिधान केलेले कपडे वेगळे असले की आपल्याला तिथले लोक लगेच ओळखून घेतात आणि त्यानं काहीही होऊ शकतं. त्यामुळे स्थानिक लोकांसारखे कपडे परिधान करा.
कनेक्टेड रहा
असा मोबाईल नेहमी सोबत ठेवा जो कोणत्याही स्थितीत काम करेल. याशिवाय आपत्कालीन क्रमांक तुमच्याजवळ ठेवा. पोर्टेबल चार्जर सोबत नेण्यास विसरू नका.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)