एक सेलिब्रिटी ठरला शेकडोंच्या मृत्यूचं कारण? जाणून घ्या अपघाताची इनसाईड स्टोरी!

दक्षिण कोरियात हॅलोविन पार्टीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 151 वर पोहोचली आहे

Updated: Oct 30, 2022, 11:04 AM IST
 एक सेलिब्रिटी ठरला शेकडोंच्या मृत्यूचं कारण? जाणून घ्या अपघाताची इनसाईड स्टोरी! title=
(फोटो सौजन्य - सोशल मीडियावरुन साभार)

दक्षिण कोरियात (south korea) हॅलोविन पार्टीदरम्यान (Halloween Party) झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede) मृतांची संख्या 151 वर पोहोचली आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की या घटनेनंतर 50 हून अधिक लोकांना हृदयविकाराचा झटका ( cardiac arrest) आला होता. अनेक लोक रस्त्यावर पडून होते. पोलीस रस्त्यावरील लोकांना सीपीआर (CPR) देताना दिसले. या चेंगराचेंगरीनंतर (Stampede) राजधानी सियोलमधील (Seoul) 400 हून अधिक आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. तर जवळपास 140 रुग्णवाहिका (ambulances) जखमींवर उपचार करण्यासाठी रस्त्यावर तैनात करण्यात आल्या. (South Korea Halloween Horror 150 Dead In Stampede)

शनिवारी रात्री इटावॉन लेजर जिल्ह्यात हॅलोवीन पार्टीचं (Halloween Party) आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यानंतर चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाल्याले. यातील 50 जणांना हृदयविकाराचा झटका (cardiac arrest) आला. आता या घटनेची जी माहिती समोर आली आहे ती अधिक धक्कादायक आहे. ही घटना घडली त्यावेळी 4 मीटर रुंद रस्त्यावर एक लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. यानंतर अचानक घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली.

दक्षिण कोरियाच्या (south korea) सोलमधील एका भागात एका अरुंद रस्त्यावरून शेकडो मृतदेह सापडले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेकांचे वय 20 च्या आसपास आहे. अधिकाऱ्यांनी या घटनेत ड्रग्जचा (drugs) सहभाग असल्याचा दाव्याला नकार दिला आहे.  हॅमिल्टन हॉटेलजवळील इटावॉनमधील एक अरुंद रस्ता शेकडो लोकांनी खचाखच भरलेला होता. कोविड (Covide-19) निर्बंध उठवल्यानंतर हा पहिला हॅलोविन कार्यक्रम होता. दक्षिण कोरियाच्या माध्यमांनुसार, रात्री 10.22 च्या सुमारास पहिल्यांदा आपत्कालीन परिस्थितीची सूचना देण्यात आली.  चार मीटर-रुंद असलेल्या रस्त्यामध्ये 100,000 पेक्षा जास्त लोक होते आणि हॉटेल आणि इटावा मेट्रो स्टेशनमधून प्रचंड गर्दी बाहेर येत होती.

कोरियन माध्यमांनी असा दावा केला आहे की जेव्हा रस्त्यावर 'सेलिब्रेटी' दिसला तेव्हा ही गर्दी आणखी वाढली. ज्या रस्त्यावर चेंगराचेंगरी झाली तो चार मीटर रुंद आहे. या रस्त्यावर एक गाडीही व्यवस्थित बसत नाही. गर्दी वाढल्याने लोक एकमेकांच्या अंगावर पडू लागले. लोकांमध्ये गुदमरणे आणि हृदयविकाराची लक्षणे दिसू लागली. गर्दीमुळे रुग्णवाहिकेला (ambulances) पीडितापर्यंत पोहोचणे कठीण झाले. पोलीस कारच्या वर उभे होते आणि लोकांना तेथून जाण्यास आणि रुग्णवाहिकेसाठी (ambulances) मार्ग तयार करण्यास सांगत होते. बचाव कार्यासाठी तयार केलेला मार्ग रोखून बरेच लोक रस्त्यावर बराच वेळ नाचत आणि गाण होते. रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचू न शकल्याने आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञांनी अपघातग्रस्तांना रस्त्यावरच सीपीआर देण्यास सुरुवात केली.

दरम्यान, काही अहवालांनुसार एका सेलिब्रिटीमुळे लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.  ITV च्या वृत्तानुसार, जेव्हा लोक रस्त्यावर उपस्थित होते, तेव्हा अचानक लोकांना एक सेलिब्रिटी दिसला. यानंतर तो ग्रुप बारच्या दिशेने धावू लागला आणि बघता बघता चेंगराचेंगरी झाली. रस्त्याच्या आजूबाजूला काही ठिकाणी ही सेलिब्रिटी हजर होती. त्याला पाहिल्यानंतर लोक वेडे झाले आणि मग त्याचे वेडेपण या अपघाताचे कारण बनले.