Sri Lanka संकटात, मध्यरात्रीपासून आणीबाणीची घोषणा

श्रीलंकेतील परिस्थिती सध्या बिकट होत चालली आहे. 

Updated: May 6, 2022, 11:07 PM IST
Sri Lanka संकटात, मध्यरात्रीपासून आणीबाणीची घोषणा title=

कोलंबो : स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेवर पुन्हा एकदा आणीबाणी लागू झाली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी मध्यरात्रीपासून आणीबाणी जाहीर केली आहे. याआधीही श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे आणीबाणी लागू करण्यात आली होती. (Sri Lanka Declares State Of Emergency)

सध्या श्रीलंका केवळ आर्थिक संकटाचाच सामना करत नाही, तर तो राजकीय अस्थिरतेचा काळही पाहत आहे. नुकताच राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. अध्यक्ष असताना त्यांनी कर्तव्य नीट बजावले नाही, असा आरोप करण्यात आला.

श्रीलंकेची ढासळणारी अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई हे सध्या राष्ट्रपतींवर होत असलेल्या आरोपांचे मुख्य कारण आहे. श्रीलंकेतील परिस्थिती सध्या बिकट होत चालली आहे. 30 रुपयची अंडी आणि 380 रुपयाचे बटाटे तिथे मिळत आहेत यावरून वाईट परिस्थितीचा अंदाज येतो. 

पेट्रोल आणि डिझेलचाही मोठा तुटवडा असून खाद्यपदार्थांसाठीही लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या सर्वांशिवाय चुकीच्या धोरणांमुळे श्रीलंका कर्जात बुडाला आहे. इतके कर्ज की ते फेडण्यासाठीही त्याला कर्ज घ्यावेच लागेल. या कारणास्तव श्रीलंका स्वातंत्र्यानंतरचा सर्वात वाईट काळ पाहत आहे.