तालिबानचा दहशतवादी सिराजुद्दीन कोरोना पॉझिटीव्ह, पाकिस्तानच्या रुग्णालयात उपचार

सिराजुद्दीनच्या संपर्कात आलेले नेते संक्रमित झाल्याची शक्यता 

Updated: May 23, 2020, 11:02 AM IST
तालिबानचा दहशतवादी सिराजुद्दीन कोरोना पॉझिटीव्ह, पाकिस्तानच्या रुग्णालयात उपचार title=

कराची : तालिबानचा उपनेता आणि हक्कानी नेटवर्कचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी कोरोना पॉझिटीव्ह आहे. त्याला रावलपिंडीमध्ये पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सिराजुद्दीन हक्कानीने नुकतीच तालिबानी कमांडरशी भेट घेतली होती. त्यामुळे सिराजुद्दीनच्या संपर्कात आलेले नेते संक्रमित झाल्याची शक्यता व्यक्त करण्या येतोय. 

पाकिस्तानमध्ये तालिबानी, हक्कानी नेटवर्क आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा अहवाल अमेरिकेच्या सुरक्षा विभागाने दिला. अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैनिकांना हटवण्यासाठी २९ फेब्रुवारीला अमेरिका आणि तालिबानमध्ये एक करार झाला होता.

हे वाचा : पाकिस्तानात विमान कोसळलं; ९८ प्रवासी दगावल्याची भीती

पॅंटगॉनने दिलेल्या नव्या अहवालानुसार अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद पसरवणाऱ्या हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानतर्फे प्रोत्साहन दिले जात आहे. भारताच्या प्रभावाविरुद्ध नेटवर्क उभे करण्यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. 

काबूल आणि पूर्व प्रांतात झालेल्या हिंसाचारामागे हक्कानी नेटवर्क असल्याचा संशय अफगाणिस्तान सुरक्षा एजंसीनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी रुग्णालयावर हल्ला चढवला होता. यामध्ये नवजात बालकांसहीत १६ जणांचा मृत्यू झाला होता. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमध्ये ४० हून अधिक नागरिक मारले गेले. 

दरम्यान सिराजुद्दीन कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे वृत्त तालिबानच्या इतर नेत्यांनी फेटाळून लावले आहे. सिराजुद्दीन पूर्णपणे बरा असून खोट्या बातम्या चालवल्या जात असल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले.