टीम 360 एक्सप्लोररमार्फत स्वातंत्र्यदिनी आफ्रिकेतील सर्वोच्च किलीमांजारो शिखर सर

स्वतंत्र दिनाच्या निमित्ता ने किलीमंजारो येथे राष्ट्रध्वज फडकवनारी स्मिता घुगे ही महाराष्ट्रातील नाही तर देशातील पहिली महिला आहे.

Updated: Aug 17, 2021, 01:24 PM IST
टीम 360 एक्सप्लोररमार्फत स्वातंत्र्यदिनी आफ्रिकेतील सर्वोच्च किलीमांजारो शिखर सर title=

टांझानिया : दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी देशाचा तिरंगा जगभरातील वेगवेगळ्या शिखरांवर तिरंगा फडकवून आगळेवेगळे कार्य करणाऱ्या एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर मार्फत यंदा आफ्रिका येथे ही मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेत स्मिता घुगे हिने शिखर सर करून इतिहास घडवला आहे. 

या मोहिमे अंतर्गत स्मिता घुगे हिने 15 ऑगस्ट च्या निमित्ताने किलीमांजारो या शिखरावर भारताचा झेंडा ही फडकविला आहे. इतकेच नव्हे तर 75व्या स्वतंत्र दिना निमित्त स्मिता घुगे ने चक्क 75 फूट लांबीचा राष्ट्र ध्वज ही किलीमंजारो येथे फडकवून एक अनोखा विश्व विक्रम येथे स्थापित केला आहे.

स्वतंत्र दिनाच्या निमित्ता ने किलीमंजारो येथे राष्ट्रध्वज फडकवनारी स्मिता घुगे ही महाराष्ट्रातील नाही तर देशातील पहिली महिला आहे.

लग्नाच्या पैशातून स्मिता घुगेने किलीमांजारो सर केले. युनायटेड नेशन्सच्या गोल्ससाठी समर्पित व 360 एक्सप्लोरर मार्फत आयोजित मोहिमेत प्रथमच किलीमांजारो शिखरावर "हुंडाविरोधी" नारा देण्यात आला. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांचा गेल्या एक वर्षांपासून खडतर सराव सुरु होता.