Corona च्या नव्या सब व्हेरिएंटची धास्ती; अनेक शहरांमध्ये प्रादुर्भाव वाढल्यामुळं Lockdown ची वेळ

Corona गेला म्हणता म्हणता या विषाणूच्या नव्या सब व्हेरिएंटनं त्याचे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असल्यामुळं आता नाईलाजानं लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

Updated: Oct 13, 2022, 09:40 AM IST
Corona च्या नव्या सब व्हेरिएंटची धास्ती; अनेक शहरांमध्ये प्रादुर्भाव वाढल्यामुळं Lockdown ची वेळ  title=
tension arises as china observes Corovirus omicron new sub varient new cases

Coronvirus : आरोग्य यंत्रणांकडून येणारी आकडेवारी पाहता आता देशातून कोरोना (Corona) जवळपास हद्दरापार झाला असं वाटत असतानाच या विषाणूच्या नव्या सब व्हेरिएंटनं पुन्हा डोकं वर काढल्याची माहिती समोर आली आहे. अनेक शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असल्यामुळं आता नाईलाजानं लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. सणासुदीचे दिवस सुरु होत असतानाच आता हे नकोसं संकट येऊन ठेपल्यामुळं अनेकांवरच डोकं धरण्याची वेळ आली आहे. पण, तूर्तात तुम्हाला याची फारशी चिंता करण्याची गरज नाही. कारण, अद्यापही भारतात कोविडसंदर्भातील परिस्थिती बिघडलेली नाही. तर, ही परिस्थिती चिंताजनक वळणावर पोहोचली आहे ती म्हणजे चीनमध्ये (tension arises as china observes Corovirus omicron new sub varient new cases). 

चीनमध्ये कोरोना पुन्हा फोफावू लागल्यामुळं आता अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. नागरिकांसाठी घराबाहेर पडण्यावर निर्बंध लावण्यात आले असून, प्रवासासाठीही काही नियम आखून देण्यात आले आहे. सध्या चीनमध्ये कोरोनाचे सब व्हेरिएंट (Corona Sub varient)  बीएफ.7 आणि बीए.5.1.7 यांचा प्रसार झाल्याचं कळत आहे. 

आकडेवारी काय सांगते? 
हाती आलेल्या आकडेवारीनुसार 10 ऑक्टोबरला चीनमध्ये कोरोनाचे 2089 रुग्ण आढळले होते. 20 ऑगस्टनंतर नोंदवण्यात आलेला हा सर्वात मोठा आकडा होता. चीनच्या Shenzhen मध्ये बीएफ 7 चेही नवे रुग्ण आढळू लागले आहेत. तर, कोविड रुग्णांमध्ये तिपटीनं वाढ झाल्यामुळं चिंता वाढली आहे. (China Lockdown)

अधिक वाचा : 70 से 80 वयोगटातील व्यक्तींची Blood Sugar Level किती असली पाहिजे?

Shenzhen मध्ये परिस्थिती इतक्या गंभीर वळणावर पोहोचली आहे, की अचानकच तिथल्या सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक स्थळांवरही नागरिकांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. फक्त चीनंच नव्हे तर, युके आणि जर्मनीमध्येही कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणांना संकटात टाकलं आहे. हा नवा व्हेरिएंट रोगप्रतिकारक शक्तीचं कवच तोडून शरीरात शिरत असल्यामुळं नागरिकांनाही सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.