70 से 80 वयोगटातील व्यक्तींची Blood Sugar Level किती असली पाहिजे?

सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. यापैकी एक म्हणजे मधुमेह. मधुमेहाच्या व्यक्तींना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. जर आपण वेळीच यावर उपाय केला नाही तर यामुळे अजून विविध आजार होण्याचा धोका असतो. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, योग्य आहार आणि व्यायाम यांच्या माध्यमातून मधुमेहाला नियंत्रणात ठेवलं जाऊ शकतं.

Updated: Oct 13, 2022, 09:16 AM IST
70 से 80 वयोगटातील व्यक्तींची Blood Sugar Level किती असली पाहिजे? title=

मुंबई : सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. यापैकी एक म्हणजे मधुमेह. मधुमेहाच्या व्यक्तींना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. जर आपण वेळीच यावर उपाय केला नाही तर यामुळे अजून विविध आजार होण्याचा धोका असतो. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, योग्य आहार आणि व्यायाम यांच्या माध्यमातून मधुमेहाला नियंत्रणात ठेवलं जाऊ शकतं.

रक्तात वाढलेली बल्ड शुगर ही कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी धोकादायक असते. मात्र वयस्कर व्यक्तींना याचा अधिक धोका असतो. याचसाठी आज आम्ही तुम्हाला वयाच्या 70 ते 80 व्या वर्षी ब्लड शुगरची पातळी किती असली पाहिजे याबाबत माहिती देणार आहोत.

70 से 80 वर्षांच्या व्यक्तींची ब्लड शुगर लेव्हल किती असली पाहिजे?

हेल्थ एक्स्पर्ट्सच्या मतानुसार, 70 ते 80 वयोगटातील लोकांची साखरेची पातळी 100 mg/dl ते 140 mg/dl दरम्यान असली पाहिजे. या वयातील लोकांसाठी उपवासादरम्यान शुगल लेव्हल किंवा रिकाम्या पोटी शुगर 100mg/dl आणि जेवणानंतर 140mg/dl पर्यंत असली पाहिजे. दरम्यान जर या लेव्हलपेक्षा जास्त असेल तर ती धोक्याची घंटा असू शकते.

मधुमेहींची रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे नैसर्गिक उपाय 

अळशीच्या बीयांमध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रक्तातील साखर कमी होण्यासोबतच फॅट्स कमी करण्याचीही क्षमता असते. सकाळी रिकाम्या पोटी चमचाभर अळशीच्या बीया चावून चावून खा. त्यावर ग्लासभर पाणी प्यावे.  

कडुलिंबाची पानंदेखील आरोग्याला फायदेशीर आहेत. यामुळे शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण सुधारते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित सकाळी ग्लासभर पाण्यात 8 कडुलिंबाची पानं उकळा. हे पाणी गाळून प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. 

आवळ्यातील व्हिटॅमिन सी घटक स्वादूपिंडाचे कार्य सुधारायला मदत करतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. कपभर पाणी दोन चमचे आवळ्याचा रस मिसळा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.