Woman Fight In Gym: अमेरिकेमधील फ्लोरिडा येथील एका जिममध्ये एका मॉडेलबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. महिलेना तिच्याशी जबरदस्ती करण्याची प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला जोरदार प्रत्युत्तर दिलं. जिममधील सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण घटनाक्रम कैद झाला असून या महिलेनं केलेला प्रतिकार पाहून तिचं अनेकांनी कौतुक केलं आहे. पोलिसांनीही या तरुणीने दाखवलेल्या हिंमतीचं कौतुक केलं आहे.
झालं असं की, 24 वर्षीय नशाली अलमा नावाची मॉडेल 22 जानेवारी रोजी अमेरिकेतील हिल्सबोरो काउंटी क्षेत्रातील जिममध्ये व्यायाम करत होती. त्यावेळी जॅवियर थॉमस जॉन्स नावाची व्यक्ती जिममध्ये आली. जिममध्ये शिरल्यानंतर जॅवियर नशालीची छेड काढू लागला. तो नशालीशी अंगलट करु लागला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नशाली गोंधळून गेली मात्र तिने हिंमत सोडली नाही. तिने जॅवियरला तुफान चोप दिला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नशालीने केलेला प्रतिकार आणि या छेडछाड करणाऱ्यांचा ज्या पद्धतीने समाचार घेतला ते पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की एक व्यक्ती जिमच्या बाहेर उभा आहे. या व्यक्तीचा विचार चांगला नाही याची जाणीव नशालीला होते. मात्र ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि जिममध्ये व्यायाम करु लागते. मात्र ही व्यक्ती आतमध्ये शिरते आणि नशालीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करु लगाते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही क्षण गोंधळून गेल्यानंतर नशाली स्वत:ला सावरते आणि या हल्लेखोराला चोप देते.
हा व्हिडीओ पोलिसांनी त्यांच्या अधिकृत इंन्स्ताग्राम हॅण्डलवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलं, कुठे घडलं, कसं घडलं यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये नशाली, "हल्लोखोर आत आला आणि मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करु लागला. त्यावेळी मी त्याला हे तू काय करत आहेस असं विचारलं. त्यानंतर तो माझ्यावर बळजबरी करु लगाला. मग आमच्यात झटापटी झाली. माझ्या पालकांनी अशाप्रकारे हल्ला झाल्यास तुटून पडायचं अशी शिकवण दिली आहे. त्यानुसार मी प्रतिकार केला," असं सांगते.