close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

तो घरासमोर जुने टीव्ही ठेऊन जातो, काय आहे गूढ ?

अमेरिकेतल्या व्हर्जिनियात सध्या एका टीव्ही मॅनने गूढ निर्माण केले आहे.  

Updated: Aug 24, 2019, 10:25 PM IST
तो  घरासमोर जुने टीव्ही ठेऊन जातो, काय आहे गूढ ?

न्यूयॉर्क : अमेरिकेतल्या व्हर्जिनियात सध्या एका टीव्ही मॅनने गूढ निर्माण केले आहे. हा टीव्ही मॅन लोकांच्या घरासमोर जुने टीव्ही ठेऊन जातो. हा टीव्ही मॅन कोण आहे, त्यानं टीव्ही कशाला ठेवले याचं गूढ मात्र उकलले नाही. एक माणूस हातात टीव्ही घेऊन येतो. त्याच्या डोक्यावरही टीव्हीच्या आकाराचे शिरस्त्राण आहे. हा टीव्ही मॅन अमेरिकेत चर्चेचा विषय झाला आहे.

 

हा टीव्ही मॅन व्हर्जिनियातल्या प्रत्येक घरासमोर जुने टीव्ही ठेवतो. काही घरांसमोर लावलेल्या सीसीटीव्हीत या टीव्ही मॅनचा कारनामा चित्रित झाला आहे. चोरपावलाने आलेला हा टीव्ही मॅन हातात जुन्या काळातला टीव्ही घेऊन येतो. दरवाजासमोर टीव्ही ठेवल्यानंतर समोरच्या कॅमेरासमोर तो पाहून हात हलवून टाटाही करतो. डोक्यावर टीव्हीच्य़ा आकाराचं शिरस्त्राण घातल्यानं तो नक्की कोण आहे हे सुद्धा माहिती नाही. त्याने व्हर्जिनियातल्या जवळपास ५० घरांसमोर हे टीव्ही सेट्स ठेवलेत. 

टीव्ही मॅनने कुणाला दुखापत केलेली नाही. पण टीव्ही ठेवण्यामागचा उद्देशही कळत नाही. नागरिकांच्या घरासमोर ठेवलेल्या टीव्हीपैकी काही चालूही आहेत. पण ते जुने असल्यानं त्यांना कोणीही घरात ठेवायला तयार नाही. टीव्ही गोळा करून न्यावे लागत असल्यानं पोलीसही हैराण आहेत. ही एखाद्या कंपनीची मार्केटिंग ट्रिक आहे की कोणी मस्करी करत आहे हे मात्र कळायला मार्ग नाही.