Time Traveller: मे महिन्यात चंद्र गुलाबी होणार आणि.... टाईम ट्रॅव्हलरचा आश्चर्यकारक दावा

Time Traveller:  भविष्यातील सन 2858 या वर्षातून परत अल्याचा दावा या टाईम ट्रॅव्हलरने केला आहे.  @darknesstimetravel नावाच्या सोशल मीडिया हँडलवरुन या  टाईम ट्रॅव्हलरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने त्याने 800 वर्षांनंतर जगात काय घडेल हे आपण पाहिले असल्याचा दावा केला आहे. 

Updated: Apr 8, 2023, 06:51 PM IST
Time Traveller: मे महिन्यात चंद्र गुलाबी होणार आणि.... टाईम ट्रॅव्हलरचा आश्चर्यकारक दावा title=

Time Traveller: एलियन्स खरोखरचं अस्तित्वात  आहेत की नाही याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. त्यातच अलिकलडे टाईम ट्रॅव्हलर ही संकल्पना देखील चांगलीच चर्चेत आली आहे. अनेक जण आपण  टाईम ट्रॅव्हलर असल्याचा दावा करत आहेत. अशाच एका टाईम ट्रॅव्हलरने चंद्राबाबत आश्चर्यकारक दावा केला आहे. मे महिन्यात चंद्र गुलाबी होणार असून याचे अनेक गंभीर दुष्परिणाम होतील असे या टाईम ट्रॅव्हलरचे म्हणणे आहे (Time Traveller). 

भविष्यातील सन 2858 या वर्षातून परत अल्याचा दावा या टाईम ट्रॅव्हलरने केला आहे.  @darknesstimetravel नावाच्या सोशल मीडिया हँडलवरुन या  टाईम ट्रॅव्हलरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने त्याने 800 वर्षांनंतर जगात काय घडेल हे आपण पाहिले असल्याचा दावा केला आहे. 

या व्हिडिओमध्ये @darknesstimetravel  अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. विशेष म्हणजे भविष्यवाणी सांगाताना त्याने या घटना कधी घडणार  याच्या तारखा देखील जाहीर केल्या आहेत. 13 मे 2023 रोजी चंद्र अचानक गुलाबी रंगाचा होऊन जाईल.  जो कोणी हा चंद्र पाहण्याची चूक करेल त्याला अंधत्व येईल असा दावा या  टाईम ट्रॅव्हलरने केला आहे. 

2 जून रोजी पृथ्वीवर राहणार्‍या 6 मानवांना सूर्यातून निघणाऱ्या दुर्मिळ ऊर्जेमुळे महासत्ता प्राप्त होईल. 16 जून रोजी एक प्रसिद्ध सेलिब्रिटी स्वतःच्या मृत्यूचे नाटक करेल याचा परिणाण जागतीक घडामोडींवर होईल. 22 सप्टेंबर रोजी एरिया 51 यशस्वीपणे पहिला सेंटॉर तयार करेल. यामुळे एलियनबद्दल अधिक माहिती मिळेल. तसेच मनुष्य आणि एलियन यांचा थेट संपर्क होईल. 

याच टाईम ट्रॅव्हलरने यापूर्वी असाचा एक दावा केला होता. 2 एप्रिल अशी तारीख जाहीर करत त्याने हा दावा केला होता. 2 एप्रिल रोजी एक नवीन घटक शोधला जाईल, जो ऑक्सिजनची जागा घेईल आणि मानवाचे आयुष्य वाढेल. मात्र, 2 एप्रिल ही तारीख उलटून गेली असली तरी त्याच्या दाव्या प्रमाणे काहीही घडलेले नाही किंवा तशा प्रकारची कोणतीही बातमी ऐकायला मिळालेली नाही.