Fire Shot चा नाद पडला महागात, अचानक आग लागली आणि तरुणी होपळली... Video व्हायरल

Fire Shot Burn Women Viral Video: सध्याच्या तरुणाईमध्ये नवनवे ट्रेंड येत असतात. सध्या फायर शॉटचा ट्रेंड आहे, पण हा ट्रेंड एका तरुणीला चांगलाच महागात पडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Apr 28, 2023, 10:46 AM IST
Fire Shot चा नाद पडला महागात, अचानक आग लागली आणि तरुणी होपळली... Video व्हायरल title=

Fire Shot Burn Women Viral Video: सध्याच्या सोशल मीडियाच्या (Social Media) काळात नव-नवे ट्रेंड येत असतात. सोशल मीडियावर एखादा ट्रेंड आला की तो काही वेळात संपूर्ण जगभरात पसरतो. सध्या फायर पानसारखंच फायर शॉटची (Fire Shots) फॅशन तरुणाईमध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे. बार आणि पब्समध्ये तरुण वर्गाकडून फायर शॉटला मोठी मागणी असते. पण अनेकवेळा फायर शॉटमुळे अपघातही घडतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. 

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडिओ @HumansNoContext नावाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 49 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तरुण-तरुणींचा एक ग्रुप हॉटेलमध्ये एका टेबलाजवळ बसलेले या व्हिडिओत दिसत आहेत. एक वेटर त्या टेबलावर एक प्लेट ठेऊन त्यावर फायर शॉट बनवत असताना दिसतोय. प्लेटवर असलेल्या एका काचेच्या ग्लासात मद्य टाकलं जातं, त्यात विविध फ्लेवर्स मिसळले जातात आणि मद्याला आग लावली जाते. 

पण  असं करत असताना अचानक आगीने पेट घेतला आणि टेबलाजवळ बसलेली एक तरुणी यात होरपळताना या व्हिडिओत दिसत आहे. त्या तरुणीच्या कपड्यांनाही आग लागली. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काही युजर्सने फायर शॉट या प्रकारवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर काही नविन करण्याच्या नादात एखाद्याच्या जीव जावू शकतो अशी प्रतिक्रिया काही युजर्सने दिली आहे. 

'Work From Theatre'
दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कोरोना काळात कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली होती. पण आता सोशल मीडियावर वर्क फ्रॉम थिएटरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती चक्क चित्रपटगृहात लॅपटॉक उघडून काम करताना दिसत आहे. हा व्यक्ती आपल्या कामात इतका मग्न आहे की चित्रपट पाहिला आला आहे हे देखील तो बहुदा विसरुन गेलाय. 

हा व्हिडिओ बंगळुरुचा असण्याची शक्यता आहे. कारण इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ bangalore_malayalis या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मोठ्याप्रमाणावर शेअर केला जात असून आतापर्यंत याला 43 हजार लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर युजर्स अनेक प्रतिक्रिया देत आहे. काही जणांनी म्हटलंय, बिचाऱ्याच्या कामाची डेडलाईन असेल. एका युजरने म्हटलंय, असं फक्त बंगळुरुमध्येच होऊ शकतं. तर एका युजरने म्हटलं 'Work From Theatre'