Trending news : एखाद्या व्यक्तीसोबत आपण नकळत जास्त वेळ व्यतीत करू लागतो. त्या व्यक्तीसोबत आपलं बोलणं- चालणं वाढतं आणि एखाद्या दिवशी त्याच व्यक्तीसोबत कोणत्या कारणानं नव्हे, तर फक्त त्यांच्यासोबतच वेळ व्यतीत करण्यासाठी म्हणून आपण डेटवर जातो. 'डेट', काही वर्षांपूर्वी फारच इंग्रजाळलेला हा शब्द आता मात्र तरुणाईच्या तोंडी सर्रास पाहायला मिळतो. मी किंवा ती/ तो अमुक एकासोबत डेटवर गेली, जाणार वगैरे वगैरे. या डेट असतातही तितक्याच खास बरं.
इथं अनेकदा छानछान कपडे घालणं होतं, समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी पाहून त्यानुसार गोष्टींची आखणी करणं असो किंवा मग डेटवर गेलं असता एकमेकांच्या आवडीच्या पदार्थावर ताव मारणं असतो. प्रत्येकासाठी ही डेट खास आणि तितकीच अविस्मरणीय अपेक्षित असते.
अटलांटा येथील एका तरुणासोबत मात्र घोळच झाला. प्रेयसीसह तो डेटवर गेला. तिथं चार प्रेमाच्या गोष्टी होतील वगैरे वगैरे विचार त्यानं केला पण, प्रत्यक्षात असं काही घडलं की त्याला डेट अर्थ्यावर सोडूनच चक्क पळ काढावा लागला.
डेटदरम्यान या जोडीनं Oysters म्हणजेच तिसऱ्या किंवा शिवल्या/ शिंपल्याचाच एक प्रकार मागवला होता. त्यावेळी सोबत आलेल्या त्याच्या प्रेयसीनं एकदोन नव्हे, तर तब्बल 48 ऑयस्टर बघता बघता फस्त केले. बरं हे हॉटेलही काही साधंसुधं नव्हतं. त्यामुळं तिची खादाडी त्याला चांगलीच महागात पडली आणि तब्बल 13 हजार रुपयांचं बिल आलं.
बिलाची रक्कम पाहून बॉयफ्रेंड चक्रावला आणि त्यानं डेटमधूनच पळ काढला. मग काय? त्या मुलीलाच तिच्या हावरटपणासाठी पैसे मोजावे लागले. आता तुम्ही म्हणाल हे कोणासोबत घडलं, तर हे घडलंय युएसमधील टिकटॉकर आणि सोशल मीडिया इंफ्लुएन्सर equanaaa सोबत.
equanaaa असं या टिकटॉकरच्या अकाऊंटचं नाव. ती बॉयफ्रेंडसोबत अटलांटा येथील फॉनेस्टीन ऑयस्टर हाऊस इथं गेली होती. तिथं तिनं 15 डॉलर प्रती प्लेट इतकी किंमत असणाऱ्या जवळरास 4 डझन ऑयस्टर खाल्ले. याशिवाय डेटमध्ये तिनं क्रॅब केक, पोटॅटो, लेमन ड्रॉप मार्टिनी अशाही काही गोष्टी मागवल्या होत्या.
दोघांनीही खाणं सुरु केलं, आणि तिनं अमर्याद खाल्लं. शेवची 150 युरो म्हणजे जवळपास 13 हजारांचं बिल आलं आणि बॉयफ्रेंड हडबडला. त्यानं वॉशरुमला जाण्याचा बहाणा केला आणि तो तिथून पसार झाला. शेवटी काय, तिलाय या खाण्यापिण्याचे पैसे भरावे लागले. सोशल मीडियावर ज्यावेळी या मुलीनं या डेटची माहिती दिली तेव्हा तिनं त्या मुलानंच आपल्याला डिनर डेटवर बोलवलं होतं असं सांगितलं. बरं हा झाला प्रकार पाहून हॉटेल मालकही हैराणच झाले.
|
MI
(20 ov) 195/6
|
VS |
PBKS
198/3(16.3 ov)
|
| Punjab Kings beat Mumbai Indians by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 146
|
VS |
RCB
149/5(15.1 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Lucknow Super Giants by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
CSK
(20 ov) 192/5
|
VS |
KKR
160/7(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.