Trending News In Marathi: तुम्ही एक बेड खरेदी करण्यासाठी ५ कोटी खर्च कराल का? या किंमतीत तर मुंबईत एक घर खरेदी करता येईल, असाच तुम्ही विचार कराल. मात्र, या जगात असेही लोक आहेत ज्यांना वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यास व साठवण्यास आवडतात. खरंतर स्वीडिश कंपनीने हेस्टेंसने हँडक्राफ्टेड बेड तयार केला आहे. याला कंपनीने स्लीप इन्स्ट्रूमेंट असं नाव दिलं आहे. एका वृत्तानुसार, अनेक दिग्गद लोकांकडे हा बेड आहे. यात बेयॉन्स, ब्रेड पिट, ड्रेक, टॉम क्रूज आणि अँजेलिना जोली यांचादेखील समावेश आहे.
चेक्सचा पॅटर्न असलेल्या या बेडची वेगवेगळ्या पॅटर्न आहेत. तर, सुरुवातीची किंमत $25,000 पासून (2 कोटी) सुरू होते. असं म्हणतात या पलंगामध्ये हॉर्सेटेल केस असतात. हेस्टेंसकडून या बेडचे डिझाइन करण्यात आले आहे. 1852मध्ये स्वीडनच्या वास्टमॅनलँड काउंटीमध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. कंपनीकडून या बेडची 25 वर्षांच्यी वॉरंटी देण्यात आली आहे.
कंपनी म्हणते की, हा पलंग खरेदी करण्यासाठी ग्राहकाने आमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही ग्राहकांनी बेड विकत घेण्याआधी त्यांची ट्रायल घेण्याचा सल्ला घेतो. ज्या पलंगावर तुम्ही आयुष्यभर झोपणार आहात त्याची सुरुवातीला ट्रायल घेणे गरजेचे, अशी कंपनीची टॅगलाइन आहे.
हेस्टेंसचे सर्वात खास फिचर म्हणजे स्लीप स्पा फीचर. यामुळं एक वेगळाच अनुभव मिळतो. ग्राहकांनी दिलेल्या अभिप्रायानुसार, हा पलंग खूपच आरामदायी आहे. या बेडचा वापर करण्याआधी त्याला हॅलो बोलण्याचे आदेश दिले जातात. तसंच, झोपण्यापूर्वी पलंगावरील गादी किती मऊ हवी हे देखील सेट करता येते, असं एका न्यूज वेबसाइटने म्हटलं आहे.
हा बेड खरेदी केल्यानंतर याची खास काळजी घेण्याची गरज असते. पलंगाला चांगल्या पद्धतीने ठेवायचे असेल. बेड 180 अंशापर्यंत फिरवण्याची गरज आहे. त्यामुळं तसेच स्लिप सरफेस तुमचे शरीराची स्थिती झोपण्यासाठी अनुकुल असेल.
लंडनमधील द लॅंगहॅम येथे हा इन्फिनिटी सूट आहे. यात एकूण 37 लेअर्स असून 200 किलोग्रॅम (440 पाउंड) पेक्षा जास्त काळजीपूर्वक निवडलेल्या साहित्यापासून बनवण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये पाहुणे झोपण्यासाठी वेगवेगळ्या Hestens बेडमधून निवडू शकतात. एका सूटची किंमत एका रात्रीसाठी $10,000 (8 लाख) इतकी आहे.