Video : भूक तहान विसरुन 12 दिवस मेंढ्यांनी रिंगण घातलं कारण...

Sheep Viral Video : गेल्या काही दिवसांपासून चीनमधील मेंढ्यांच्या रिंगणाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अखेर वैज्ञानिकांनी यामागील कारण स्पष्ट केलं आहे.

Updated: Nov 25, 2022, 08:37 AM IST
Video : भूक तहान विसरुन 12 दिवस मेंढ्यांनी रिंगण घातलं कारण... title=
trending sheep walking in circles viral video scientist claims mystery behind nmp

Sheep Walking Mystery Video : आपण दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी जेव्हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांची पालखी घेऊन निघतात. तेव्हा काटेवाडीला आपण मेंढ्यांचं रिंगण पाहिलं आहे. मेंढ्यांचं रिंगण (Sheep Mystery Viral Video) ही वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सलग 12 दिवस मेंढ्यांचं एक कळप रिंगण घालत होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (video viral on social media) झाला आहे. तहान भूक विसरून मेंढ्या असं काय करत आहेत असा प्रश्न वैज्ञानिकांपासून सर्व जगाला पडला होता. 

मेंढ्यांकडून अघटित घटनेचे संकेत

असं म्हणतात जर कुठलं संकट किंवा अघटित गोष्ट घडणार असेल, तर प्राण्यांना पहिले कळतं. त्यामुळे जेव्हा सलग 12 दिवस मेंढ्यांचं कळप भूक तहान विसरुन फिरत होते, हे पाहून वैज्ञानिक चक्रावले. या मेंढ्या एकाच जागी गोल गोल फिरत आहे, म्हणजे ते कसली अघटित घटनेते संकेत तर देत नाही ना अशी चर्चा रंगली होती. मात्र या घटनेमागील रहस्य इंग्लंडमधील एका प्राध्यापकाने उलगडल्याचा दावा केला आहे. 

म्हणून मेंढ्या गोल फिरत होत्या...

मेंढ्यांचा कळपाने असं का केलं याबद्दल इंग्लंडच्या (England) हार्टपुरी विद्यापीठाचे प्राध्यापक मॅट बेल (Professor Matt Bell) यांनी गुपित उघड केल्याचा दावा केला आहे. ते म्हणतात की, मेंढ्यांना बरेच दिवस एकाच गोठ्यात डांबून ठेवलं होतं. त्यामुळे मेंढ्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला. त्यांना कमी जागेत राहण्याची सवय लागली. त्यामुळे जेव्हा त्यांना मोकळ्या जागेत सोडण्यात आलं तरीही ते गोठ्यातील बंदिस्त जागेत जसे वावरत होते. अगदी तसेच ते इथे करत होते, असा दावा प्राध्यापकाने केला आहे. (trending sheep walking in circles viral video scientist claims mystery behind)

मेंढ्या या कळपात वावरतात त्यामुळे कळपाची एक मानसिकता असते. एक मेंढी जशी वागेल तिचं अनुकरण कळपातील इतर मेंढ्या करतात. मेंढ्यांची मानसिकता आणि सवय यावर बेल यांनी प्रकाशझोत टाकला आहे. 

असाही तर्क आला होता समोर 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर असाही एक तर्क समोर आला होता की, त्यांच्यावर कुठल्यातरी जीवाणूचा हल्ला झाला आहे. वैज्ञानिकांच्या मते, लिस्टेरियोसिस नावाच्या जीवाणूमुळे त्या अशा करत असाव्यात. हा जीवाणूमुळे मेंढ्यांच्या मेंदूवर परिणाम करतो आणि सूज येते. त्यामुळे त्यांचं शरीर लकवाग्रस्त होतं आणि त्यामुळे त्या असं करत असाव्यात, असं सांगण्यात येत आहे. 

पीपील्स डेली चाइनाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार उत्तर चीनच्या मंगोलियातील ही घटना आहे.