याला म्हणतात नशीब! 2500 हजारात 20 कोटींचं अलिशान घर, रातोरात नशीब चमकलं

'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के...' हे गाणं आपण प्रत्येकाने ऐकलं असेलं, पण खरच असं घडतं का? होय असं प्रत्यक्षात घडलंय, एका रात्रीत त्याचं नशीबच पालटलं

Updated: Dec 7, 2022, 10:18 PM IST
याला म्हणतात नशीब! 2500 हजारात 20 कोटींचं अलिशान घर, रातोरात नशीब चमकलं title=

Trending News : कुणाचं नशीब कसं बदलेल हे सांगता येत नाही. आजच्या महागाईच्या काळात पैसे कमावण्यासाठी सर्वच जण मेहनत करत असतात. मेहनत करुन अधिक पैसे कमावता येतील आणि आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवता येईल. या चिंतेत प्रत्येक व्यक्ती जगत असतो. पण जर का एका रात्रीत तुम्ही मालामाल झालात तर... सगळ्या अडचणी कमी होतील. म्हणतात ना, 'भगवान जब भी देता छप्पर फाड़ कर देता है...', अशीच काहीशी एक घटना समोर आली आहे. 

2500 हजारात 20 कोटींचं घर
एका व्यक्तीने सहज म्हणून अडीच हजार रुपयांच्या लॉटरीचं तिकिट (Lottery Ticket) काढलं. त्या व्यक्तीने स्वप्नातही विचार केला नसेल असं बक्षिस त्याला लागलं. त्या व्यक्तीने तब्बल 20 कोटींचं अलिशान घर (20 Crore Luxury House) लॉटरीत जिंकलं होतं. इतकंच नाही तर त्याला अडीच कोटी रोख रक्कमही मिळाली. ब्रिटनच्या (Britain) न्यूकॅसल इथं जन्मलेल्या मार्क नावाच्या व्यक्तीला लॉटरी लागली. त्याला स्पेनमधल्या प्रसिद्ध मारबेला भागात कोट्यवधींचं अलिशान घर मिळालं.

लॉटरीत घर लागल्याचा फोन
55 वर्षांचे मार्क ब्रिटनमध्ये पत्नी देबोराहसोबत रहातात. मार्क हे व्यावसायाने कायदेतज्ज्ञ आहेत तर त्यांची पत्नी प्रशिक्षक आहे. मार्क यांनी काही दिवसांपूर्वी 'ओमेज मिलियन पाउंड हाउस' ची लॉटरी अडीज हजारात खरेदी केली होती. लॉटरी काढल्यानंतर मार्क आपल्या कामात व्यस्त झाले. लॉटरी काढलीय हे देखील मार्क विसरून गेले होते. पण लॉटरी काढल्यानंतर काही दिवसांनी मार्क यांना 'ओमेज' कंपनीतून फोन आला आणि ग्रँड बक्षिस जिंकल्यांची त्यांना माहिती दिली. सुरुवातीला मार्क यांना विश्वासच बसला नाही. पण कंपनीने त्यांना विश्वासात घेत हे खरं असल्याचं सांगितलं.

हेही वाचा : सायलेंट किलर पत्नी! पतीवर सलग 7 महिने विषप्रयोग आणि त्यानंतर… मुंबईतील भयानक घटना

नऊ वेळा ठरले होते अपयशी
मार्क यांनी याआधी नऊ वेळा ओमेजची लॉटरी काढली होती, पण त्यांना यश आलं नव्हतं. दहाव्या वेळेस मात्र त्यांचं नशीब उघडलं, आणि रातोरात ते करोडपती झाले. 20 कोटींचं घर आणि अडीच कोटी रुपये मिळाल्याने आपल्या कुटुंबाचं आयुष्यच बदलल्याचं मार्क म्हणतात. मार्क यांना बक्षिसात लागलेलं घर तब्बल 12 हजार स्केअर फिटचं आहे. घरात अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत. याशिवाय स्विमिंग पूल आणि लॉन एरिया देखील आहे.