VIDEO: कारवाल्यासोबत पंगा घेणं बाइक चालकांना पडलं चांगलंच महागात

 बाइकवरून आलेल्या चोऱ्यांना या कारवाल्यासोबत घेतलेला पंगा चांगलांच महागात पडला. 

Updated: Aug 20, 2022, 09:37 PM IST
VIDEO: कारवाल्यासोबत पंगा घेणं बाइक चालकांना पडलं चांगलंच महागात title=
trending video car and bike accident shocking viral video in social media in marathi

Trending video: सोशल मीडियामुळे आपल्याला जगापाठीवरील अनेक घटना कळतं असतात. काही घटनाचे व्हिडीओ हे नैसर्गिक असतात तर काही व्हिडीओ खास बनवले जातात. धक्कादायक, भयानक आणि थरकाप उडवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. काही घटना अशा असतात ज्याचा आपण कधीही विचार केलेला नसतो. अशा घटनाही कॅमेऱ्यात कैद होतात आणि मग त्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. 

चोर किंवा दरोडेखोर म्हटलं की आपल्या अंगावर शहारा येतो. चोर दिसले की आपण घाबरतो पण काही लोक असे असतात की ते धैर्याने चोरांशी दोन हात करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. (trending video car and bike accident shocking viral video in social media in marathi)

या व्हिडीओमधील चोरांना चोरी करणे महागात पडले. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता रस्त्यावरुन वाहनांची ये-जा सुरु आहे. रस्त्याच्या कडेला एक कार आरामात उभी आहे. थोड्या वेळात बाइकवर दोन व्यक्ती कारच्या जवळ येतात आणि बंदूक काढून कारचालकाला घाबरविण्याचा प्रयत्न करतात. मात्र कारचालक सावध होऊन कार घेऊन तिथून निघून जातात. त्यानंतर चोर बाइकवर बसून घाईत पसार होण्याचा तयारी असतात. अचानक तीच कार रिर्व्हस येते आणि जोरदार त्या बाइकला धडकते. 

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ही धडक एवढी जोरदार असते की बाइक उद्ध्वस्त झालेली दिसते. या धडकेत ते दोन चोर थोडक्यात वाचतात आणि तिथून वेगाने रफूचक्क होतात. बाइकवरून आलेल्या चोऱ्यांना या कारवाल्यासोबत घेतलेला पंगा चांगलांच महागात पडला. 

हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर Karma Clips नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. 28 सेकंदांचा या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांहून व्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.