Couple Viral Video : रिसेप्शनसाठी निघालेले वधू - वर लिफ्टमध्ये अडकले अन् मग...

Groom Bride Viral Video : लग्न आयुष्यातील सुंदर क्षण, लग्नातील विधी  (wedding video) आणि समारंभ सुरळीत पार पडावे बस्स वधू वरापासून कुटुंबाला बाकी काही नको असतो. आयुष्यात एकदाच होणार हा सोहळा अगदी कुठल्याही विघ्न न येता संपन्न झालं पाहिजे. पण अनेक वेळा असे प्रसंग येतात की आपण हतबल होतो. असाच एका लग्नातील घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Updated: Feb 25, 2023, 07:52 AM IST
Couple Viral Video :  रिसेप्शनसाठी निघालेले वधू - वर लिफ्टमध्ये अडकले अन् मग... title=
Trending video groom bride get stuck in Elevator or lift Couple misses their own wedding reception Viral Video Social media

Groom Bride Trending Viral Video : हळद, मेहंदी, संगीत आणि मग विवाह सोहळा (wedding video)...लग्न म्हटलं की अनेक सोहळ्यांची रेलचेल...वधू आणि वराची हा खूप खास आणि अस्मरणीय क्षण असतो. नवीन जोडप्यासोबत दोन कुटुंबाचं हे मिलन...हा सोहळा अगदी सुंदर आणि आनंदात पार पडावं असे प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेक महिन्यांपासून ते या विवाह सोहळ्याची तयारी करत असतात. सोशल मीडियावर (Couple Viral Video) तर आज काल आपल्याला लग्नाचे अनेक व्हिडीओ (wedding dance video) पाहिला मिळतात. नवरीची डान्स करत (Bride video) मंडपात एण्ट्री....तर नवरदेवाचा रूबाबदार ऐटीत नववधूसाठी खास डान्स (Groom video), जिजा साली डान्स असे अनेक व्हिडीओ (Social media video) आपल्याला पाहिला मिळतात. पण सध्या एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर यूजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. यात नवरी आणि नवरदेव एका लिफ्टमध्ये अडकले आणि मग...(Social media Trending video)

रिसेप्शनला निघाले आणि लिफ्टमध्ये अडकले...

हो, हा प्रसंग ओढवला एका भारतीय नववधू आणि वरावर...नवरदेवाने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती आणि नववधूने पांढऱ्या रंगाचा लेहंगा...लग्नानंतरच्या रिसेप्शनसाठी हे जोडपं छान तयार झालं होतं. पाहुणेही हळूहळू जमाला लागले होते. या स्वागत समारंभाची (wedding reception) पूर्ण तयारी झाली होती. आता वाट होती ती नव जोडप्याची...नवरदेव नवरीही रिसेप्शनसाठी उत्साही होते. दोघेही या सोहळ्यासाठी निघाले हॉटेलच्या लिफ्टमध्ये दोघे चढले आणि मग...अहो हे काय लिफ्ट बंद पडली आणि हे जोडपे इथे अडकले...या जोडप्यासोबत काही पाहुणेही होते. (Trending video groom bride get stuck in Elevator or lift Couple misses their own wedding reception Viral Video Social media)

 स्वतःच्या लग्नाच्या रिसेप्शनला मुकावं लागलं...

हॉटेलच्या 16 व्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या रिसेप्शन पार्टीला जात असताना हे जोडपे अडकले होते. नववधूसोबत तिची बहिणी आणि वरासह इतर चार पाहुणे देखील लिफ्टमध्ये (bride and groom after being trapped in a hotel elevator) अडकले होते. हॉटेलच्या रेस्क्यू टीमने त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. अखेर या जोडप्याला आणि पाहुण्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करावं लागलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी लिफ्टचा वरचा भाग उघडला आणि वधू - वरांना एक एक करून चौथ्या मजल्यावर खेचले. अशाप्रकारे या जोडप्याची दोन तासांनी सुटका झाली.  

कुठ घडली ही घटना? 

ही घटना उत्तर कॅरोलिना, (North Carolina ) यूएसमध्ये घडली. पवन झा आणि त्यांची पत्नी व्हिक्टोरिया या सुंदर जोडप्याच्या लग्नाची सुरुवातच अशा धक्कादायक घटनेने झाली. या जोडप्याला लिफ्टमध्ये अकल्यामुळे स्वतःच्या लग्नाच्या रिसेप्शनला मुकावे लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.