'ती' रस्त्यावरुन चालत होती आणि अचानक...हृदय पिळवटून टाकणारा Video

कोणाची वेळ कधी येईल काहीत सांगता येत नाही...

Updated: Aug 17, 2022, 02:29 PM IST
'ती' रस्त्यावरुन चालत होती आणि अचानक...हृदय पिळवटून टाकणारा Video title=
trending video woman becomes victim of serious accident shocking video viral on social media in marathi

Trending Video : रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे अशाच रस्ते अपघाताचे बळी ठरले. रस्तावरुन गाडी चालवताना नियमाचे पालन करा. आपल्या जीवासोबत रस्त्यावरील इतर लोकांचा जीवही स्वस्त नाही. आपल्याला कायम सांगितलं जातं रस्त्यावरुन काळजीपूर्वक चालावं. उजवीकडे, डावीकडे सगळीकडे लक्ष द्यावं. मात्र जर एखाद्याचं नशिबचं खराब असेल तर त्याला कोण काय करणार. 

सोशल मीडियावर आपण असे अनेक अपघात बघितले आहेत. ज्यात अपघातग्रस्त व्यक्तीची काही चुकू नसते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ पाहून हा सगळ्या नशिबाचा खेळ असतो, असंच तुम्हाला वाटेल. 
(trending video woman becomes victim of serious accident shocking video viral on social media in marathi)

हृदय पिळवटून टाकणारी घटना

या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक महिला रस्त्यावरून आरामात चालत असते. रस्त्याचा कडेला एक कार उभी असते तिथे ती महिला पोहोचते तेवढ्यात मागून एक ट्रक येतो. त्या महिलेच्या बाजूने तो ट्रक जात असतो पण धानीमनी नसतानाही ही महिला दुर्घटनेची शिकार होते. नेमकं होतं असं की, जसा तो ट्रक पुढे जातो तेव्हा अचानक ट्रकचा मागचा लोखंडाचा दरवाजा उघडतो आणि रस्त्यावरून जात असलेल्या महिलेला धडकतो. 

हा अपघात इतका जोरदार असतो की महिला जागीच खाली पडते. कोणाची वेळ कधी येईल काहीत सांगता येत नाही. महिलेला तातडीने रुग्णालयता दाखल करण्यात आले म्हणून तिचा जीव वाचला. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. रस्त्यावरून चालताना कितीही काळजी घेतली तरीही कधी काय होणार सांगता येत नाही, असंच या व्हिडीओवरुन दिसून येतं. 

हा व्हिडिओ ट्विटरवर Crazy Tweets नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 'चुकीची जागा, चुकीची वेळ' असं कॅप्शन लिहिण्यात आलं आहे. 13 सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 20 हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत.