नवी दिल्ली: अनेकदा आपण महामार्गावर गाडी चालवताना खूप वेगात असतो. बऱ्यादचा आपल्या आजूबाजूने चुकीचा कट मारून लोक पुढे निघून जातात. अशावेळी धोका त्यांच्यासोबत आपल्या जीवालाही असतो. अशावेळी आपण हजरजबाबी असणं फार गरजेचं असतं. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकानं हा व्हिडीओ पाहायला हवा आणि सतर्क राहायला हवं.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की गाडी मध्येचं थांबली आहे. दुसऱ्या बाजूने अवजड वाहानं ये जा करत आहेत. डाव्या बाजूने जागा नसतानाही एक ट्रक चालक वेगानं बाजूने जातो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की त्या कार चालकाने डोकं लढवून आपली कार बाजूला घेतली. नाहीतर कार चालक आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली असती.
ALWAYS BE CAREFUL ‼️
The accident was avoided by driver's ability to offer a rapid and proper response.
Please, be always careful since not every driver is responsible while on the road!
Credits: Michael Balthazor#accident #accidenttruck #avoided #properresponse #becareful pic.twitter.com/aUXdzIrOdu
— ArmadaTruckingGroup (@armadatrucking) August 31, 2021
या कारचालकानं नशीबाने गाडी बाजूला घेतली म्हणून नाहीतर रस्त्यावर अपघाताचा थरार नक्कीच झाला असता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं त्या ट्रक चालकाने या गाडीला ठोकलं असतं ते. मात्र चालकानं आपला जीव वाचवला आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करताना सावध राहा. सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.