अमेरिका राष्ट्राध्यक्ष पद निवडणूक; रशियन अब्जाधिशांवर कारवाईचे सावट

मॉस्कोवरून आलेला इशारा धुडकाऊन लावत ट्रम्प प्रशासनाने रशियाला धक्का देण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 30, 2018, 10:48 PM IST
अमेरिका राष्ट्राध्यक्ष पद निवडणूक; रशियन अब्जाधिशांवर कारवाईचे सावट title=

नवी दिल्ली: मॉस्कोवरून आलेला इशारा धुडकाऊन लावत ट्रम्प प्रशासनाने रशियाला धक्का देण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. ट्रम्प प्रशासनाने रशियन अधिकारी आणि अब्जाधिश व्यापारी आणि नेत्यांची एक दीर्घ यादीच तयार केली आहे. सरकारकडून उपलब्ध करून दिलेल्या यादीत राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या प्रशासनातील वरिष्ठ सदस्यांचा समावेश आहेत. यात पुतीने यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांचाही समावेश आहे. 

अनेक अधिकारी आणि खासदारांचीही यादीत नावे

सुमारे सात पानांची असलेल्या या उघड यादीत अनेक व्यापारी, गुंवणूकदार सहभागी आहेत. ज्यांची संपत्ती एक अरब डॉलरहून अधिक आहे. यादीतील सर्व मंडळींना ट्रम्प सरकार पुतीन यांच्या वर्तुळातील व्यक्ती समजते. यात परराष्ट्रमंत्री सर्गेई लोवरोव आणि प्रधानमंत्री मदवेदेव आणि रशियाच्या गुप्तचर संस्थांच्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. विशेष असे की, अमेरिका प्रशासननाने प्रतिबंद केलेल्या लोकांमध्ये उर्जा क्षेत्रात प्रचंड काम केलेल्या रोसनेफ्ट आणि स्बरबॅंकसारख्या बड्या कंपन्यांचाही समावेश आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे भलतेच नाराज होण्याची चिन्हे आहेत. तसेच, या कारवाईमुळे रशियाच्या गुंतवणूकदारांना जागतीक आर्थिक तूटीला सामोरे जावे लागू शकते.

ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील संबंधांचीही होणार चौकशी

२०१६मध्ये झालेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला होता. हा रिपोर्ट अशासाठीही सादर केला जात आहे की, ज्याद्वारे ट्रम्प आणि पुतीन यांच्या संबंधांचीही चौकशी केली जाईल.विशेष असे की, ट्रम्प यांनी आपल्या भाषणात अनेकदा पुतीन आणि क्रेमलिन यांच्यावर टीका केली होती.

अमेरिकेचे न्याय विभागाचे स्पेशल प्रॉसिक्यूटर रॉबर्ट मुलर ट्रंप यांच्या निवडणुक अधिकारी आणि मॅक्सिको यांच्यातील संबंधाचा तपास करत आहेत.