पाकिस्तानचा न्यूज चॅनेल बनला कुस्तीचा आखाडा, LIVE कार्यक्रमात दे दणादण; पाहा Video

Pakistani News Channel Fight Video : विचारिक लढाई जेव्हा खोलात जाते, तेव्हा काय होतं, याचा प्रत्यय पाकिस्तानमधील एका व्हायरल व्हिडीओमध्ये पहाय़ला मिळत आहे.

Updated: Oct 1, 2023, 06:02 PM IST
पाकिस्तानचा न्यूज चॅनेल बनला कुस्तीचा आखाडा, LIVE कार्यक्रमात दे दणादण; पाहा Video title=
Pakistani News Channel Fight Video

Pakistani TV studio Video :  पाकिस्तानच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर एखाद्या स्टॅन्ड अप कॉमेडीचा शो आयोजित केला जाऊ शकतो. इम्रान खान पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर पाकिस्तानची राजकीय परिस्थिती आणखीनच खालावल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानमध्ये सध्या भ्रष्टाचार हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. त्यावरून मोठा वाद देखील पेटल्याचं पहायला मिळतंय. टीव्हीच्या लाईव्ह शोमध्ये सतत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून वाद सुरू असताना आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका टीव्ही शोमधील (News Channel Fight Video) लाईव्ह कार्यक्रमात दोन नेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं समोर आलंय.

इम्रान खान यांच्या पार्टीचे म्हणजेच पीटीआयचे नेते वकील शेख मारवत आणि नवाझ शरीफ यांच्या पक्षाचे पीएमएल-एन खासदार अफनान उल्ला यांच्यात न्यूज चॅनेलवरील लाइव्ह शोदरम्यान हाणामारी (pakistan leaders fight during tv debate) झाली. हे दोन्ही नेते डिबेटमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राडा झाला. ही घटना 27 सप्टेंबर रोजी घडल्याचं समोर आलं आहे. पण नेमकं काय झालं? वाद का पेटला?

झालं असं की, पाकिस्तानमध्ये सध्या भ्रष्टाचार कळीचा मुद्दा बनला आहे. त्यावरून डिबेट शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अफनान उल्ला आणि शेख मारवत यांना बोलवण्यात आलं होतं. चर्चेदरम्यान दोघांमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून वाद झाला अन् शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. त्याचवेळी शेख मारबत अचानक सीटवरून उठले  अन् अफनान यांना धक्का दिला. त्यामुळे मोठा राडा झाला. शोचे होस्ट जावेद चौधरी दोघांना भांडण न करण्याची विनंती करत होते. पण कोणीही काहीही ऐकलं नाही. काही वेळात जोरदार हाणामारी (Viral Video) झाली.

पाहा Video

दरम्यान, विचारिक लढाई लढताना विरोधी भूमिका ऐकण्याचं सामर्थ्य असावं लागलं. त्यात राजकीय प्रतिनिधींना याचं भान जास्त असावं. भारतात देखील परिस्थिती वेगळी नाही. अनेकदा भारतीय नेते विरोध करताना व्यक्तीगत पातळीवर उतरतात. त्यामुळे चर्चासत्र आजकाल जास्त पहायला मिळत नाही. त्यामुळे तुम्ही मतदान करताना कोणाला मत देता, यावर देशाचं भविष्य अवलंबून असतं, याचं भान असू द्या.