Pakistani Girl Car Accident : पाकिस्तानमधील एका अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जग हादरलंय. कराचीमधील कारसाझ रोडवर सोमवारी एका उद्योगपतीच्या पत्नीने कारने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना धडक दिली. यात तीन जणांना तिने कारने चिरडलं. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नताशा दानिश असं तिचं नाव असून टोयोटा लँड क्रूझरमध्ये बेदरकारपणे गाडी चालवत भीषण अपघात केला. एवढंच नाही तर या अपघातानंतर या महिलेचा क्रूर चेहरा समोर आला. ती हसत म्हणाली की, तुम्ही माझ्या वडिलांना ओळखत नाहीत. हा व्हिडीओ पाहून सर्वत्र संतापाची लाट उसळलीय.
CCTV footage of Karsaz's road accident in Karachi released. A man along with his daughter can be seen riding on a motorbike when a white car hit them from behind.#TOKAlert #Karachi pic.twitter.com/kpLjNwsk34
— Times of Karachi (@TOKCityOfLights) August 20, 2024
या अपघातात दुचाकीवर बाप लेक जात असताना तिने धडक दिली. तर या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या स्थानिक रिपोर्टनुसार नताशा ही उद्योगपती दानिश इक्बाल यांची पत्नी आहे, जे गुल अहमद एनर्जी लिमिटेडचे चेअरमन आहेत. एका वेगवान एसयूव्हीने नियंत्रण गमावले आणि सर्व्हिस रोडवर कोसळण्यापूर्वी मोटारसायकल, इतर वाहने आणि अनेक पादचाऱ्यांवर आदळली.
کراچی میں "گل احمد انرجی لمٹیڈ" کے چئیرمین دانش اقبال کی بیوی نتاشا نے شراب کے نشے میں دھت ہو کر کارساز روڈ پر اپنی پراڈو سے پانچ لوگوں کچل دیے جن میں یونیورسٹی کی طالبہ آمنہ عارف اور ان والد بھی شامل ہیں۔ دونوں جان بحق ہوگئے۔ باقی زخمی ہیں۔ pic.twitter.com/kgK805Uxl1
— Jimmy Virk - Imranian (@JimmyVirkk) August 19, 2024
प्रत्यक्षदर्शीच्या नुसार ती महिला दारुच्या नशेत होती. अपघातानंतर ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण स्थानिकांनी तिला रोखलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
Another 'spoiled kid' runs over six people in Karachi's Karsaz road, leaving two dead on the spot.
The girl driving this vehicle was said to be the daughter of a well-known textile company's director.
The vehicle is registered under GulAhmed Wind Power LTD. #Karsazaccident pic.twitter.com/tkn7EHuwJE
— Kashan Bhatti (@MkashanBhatti_) August 19, 2024
या घटनेचे व्हिज्युअल सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका वाटसरूने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये ते दृश्य दाखवण्यात आले आहे ज्यामध्ये आरोपी व्यथित अवस्थेत दिसत आहे. व्हिडीओमध्ये, तिला एका जमावाने घेरले आहे ज्याने तिची ओळख उघड करण्यासाठी तिचे रेकॉर्डिंग केले आहे. अपघातानंतर तिने जे केले त्याबद्दल कोणताही पश्चात्ताप दिसत नव्हता.
पाकिस्तानच्या जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी आरोपींचे रक्त आणि लघवीचे नमुनेही घेतले आहेत. रिपोर्ट्सनुसार, नताशा मानसिक तणावासाठी औषध घेते.