कोरोनाच्या संकटात या अब्जाधीशांची चांदी, नफ्यात मोठी वाढ

कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. 

Updated: Jun 5, 2020, 10:13 PM IST
कोरोनाच्या संकटात या अब्जाधीशांची चांदी, नफ्यात मोठी वाढ

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. काही उद्योगपतींना तर त्यांचे उद्योगच बंद करावे लागले आहेत. असं असलं तरी कोरोनाच्या या संकट काळात अमेरिकेतल्या काही अब्जाधीशांची कमाई बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिसी स्टडीज (आयपीएस)मध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार जेफ बेजोस, मार्क झुकरबर्ग आणि एलोन मस्क या अमेरिकन अब्जाधीशांच्या संयुक्त संपत्तीमध्ये कोरोना व्हायरसच्या सुरुवातीनंतर ५६५ बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच १९ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 

या रिपोर्टमध्ये ११ आठवड्यांची संपत्ती सांगण्यात आली आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची संपत्ती ३६.२ बिलियन डॉलर तर फेसबूकचे सीईओ मार्क झुकरबर्गची संपत्ती जवळपास ३०.१ बिलियन डॉलरने वाढली आहे. टेस्ला कंपनीचे सीईओ मस्क यांची संपत्तीदेखील १४.१ बिलियन डॉलरने वाढली आहे. मागच्या ६ आठवड्यांमध्ये अमेरिकन अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये ७९ बिलियन डॉलरची उसळी पाहायला मिळाली आहे.