न्यूयॉर्क : कोरोना व्हायरसमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत चीनची विमानं उडणार सल्याची धमकी दिली. या धमकीनंतर चीनने माघार घेत; अमेरिकेच्या विमानांवर घालण्यात आलेले निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे अमेरिकेची काही विमानं चीनमध्ये येतील.
चीनने सुरुवातीलाा निर्बंध आणल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही धमकी दिली. अमेरिकेत १६ जूनपासून चीनची विमानं फिरकू देणार नाही, असं उघड आव्हान ट्रम्प यांनी दिलं होतं. त्यानंर चीनने हे पाऊल उचललं आहे.
जगातल्या दोन सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनमध्ये कोरोना व्हायरसवरुन आरोग्यापासून ते कुटनितीपर्यंत प्रत्येक बाबतीत तणाव वाढला आहे. विमानांसोबतच ट्रम्प यांनी चीनी कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या धोक्याचा मुद्दा उचलला आहे. अमेरिकेच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत असलेल्या चीनी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं गुंतवणूकदारांसाठी धोकादायक असल्याचं ट्रम्प म्हणाले.
चीनी सरकारने ऑडिटर्सवर प्रतिबंध घातल्याचं उदाहरण ट्रम्प यांनी दिलं. तसंच आता कडक कारवाई करण्याची वेळ आली असल्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला. अमेरिकेतल्या चीनी कंपन्यांनी अमेरिकेतले नियम पाळण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये एक समिती नेमू, असंही ट्रम्प म्हणाले. दुसरीकडे चीनी कंपन्यांसाठी कडक नियम करण्याचं आवाहन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी जगातल्या सगळ्या स्टॉक एक्सचेंजना केलं आहे.