अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा झटका

इमरान खान यांना ट्रम्प यांचा मोठा झटका

Updated: Sep 2, 2018, 10:49 AM IST
अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा झटका title=

नवी दिल्ली : पाकिस्‍तानमध्ये बनलेल्या नव्या सरकारला अमेरिकेने चांगलाच धक्का दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी दहशतवादावर नरमाईची भूमिका चांगलीच महागात पडू शकते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इमरान खान यांना सुरुवातीलाच मोठा झटका दिला आहे. 

अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी 2100 कोटींची मदत बंद केली आहे. अमेरिकेच्या लष्कराकडून सांगण्यात आलं आहे की, 'ज्या प्रकारे पाकिस्तान दहशतवादा विरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे आम्ही पाकिस्तानला दिली जाणारी 300 मिलियन डॉलरची आर्थिक मदत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.' अमेरिकेच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी कमी झाली आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जानेवारीमध्ये पाकिस्तानला इशारा दिला होता की ती पाकिस्तानला दिली जाणारी मदत बंद करु शकतात. पेंटागनचे प्रवक्ते लेफ्टिनंट कोनी फॉकनर यांनी म्हटलं की, 'अमेरिकेचं लष्कर या पैशांचा वापर इतर महत्त्वाच्या कामांसाठी करेल.'