वॉशिंग्टन : अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याबाबत अजूनही सन्पेन्स आहे. सद्यस्थितीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आघाडीवर आहेत. बायडेन यांना आत्तापर्यंत २६४ तर ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल व्होट मिळाली आहेत. बायडेन विजयापासून केवळ ६ इलेक्टोरल व्होट दूर आहेत. बायडेन यांनी आपणच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. बहुमतासाठी २७० इलेक्टोरल व्होट्सची गरज आहे.
पाच राज्यांत अजूनही मतमोजणी सुरूय. नेवाडामध्ये बायडेन यांनी ट्रम्प यांच्या विरोधात आघाडी घेतली आहे. नेवाडा राज्यात बायडन विजयी झाल्यास त्यांना त्याठिकाणाहून ६ इलेक्टोरल व्होट्स मिळतील. नेवाडामध्ये बायेडन विजयी झाल्यास ते बहुमताचा आकडा गाठू शकतात. तर दुसरीकडे चार राज्यातल्या मतमोजणीत डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. त्या चार राज्यात विजय मिळाल्यास ट्रम्प यांना २६८ व्होट्स मिळू शकतील. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जिया, मिशिगन, विस्कॉन्सिन तसेच पेन्सिलव्हेनियामधल्या मतमोजणीवर ट्रम्प यांनी आक्षेप घेतला आहे.
मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करत ते कोर्टात गेलेत. मिशिगनमध्ये १६ इलेक्टोरल व्होट्स आहेत. याठिकाणी डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांचा विजय झालाय. त्याशिवाय विस्कॉन्सिनमधल्या मतमोजणीवरही ट्रम्प यांनी आक्षेप घेतलाय. याठिकाणी १० इलेक्टोरल व्होट्स आहेत. याठिकाणीही डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन विजयी झालेत. पेन्सिलव्हेनियाच्याही मतमोजणीवरून वाद निर्माण झालाय. याठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. आता व्हाईट हाऊसची ही फाईट कोण जिंकतं याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी अजूनही सुरुच आहे. डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. जो बायडेन यांना आतापर्यंत २६४ इलेक्टोरल कॉलेज व्होटस मिळाले आहेत. व्हाइट हाऊसची शर्यत जिंकण्यासाठी त्यांना अजून सहा मतांची आवश्यकता आहे. असोसिएटेड प्रेसनुसार एरिझोना, मिशिगन आणि विस्कॉन्सिन या राज्यांमध्ये बायडेन यांच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात येत आहेत. ही तिन्ही राज्य त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहेत.
नेवाडामध्येही बायडेन सरशी साधू शकतात असा अंदाज आहे. सहा मते बायडेन यांना नेवाडामधून मिळू शकतात. पण आठवडाअखेरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, काल ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या विजयाचा दावा केला होता. त्याचवेळी त्यांनी बायडेन आणि डेमोक्रॅटसवर घोटाळयाचा आरोप करत मतमोजणी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायलयात जाण्याची धमकी दिली होती.
दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरु असताना दुसरीकडे सुरक्षेसंदर्भातील चिंता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे. काही शहरांमध्ये ट्रम्प आणि बायडेन समर्थकांमध्ये हिंसक झटापटी झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे. वॉशिंग्टन, विस्कॉन्सिन, फिलाडेल्फिया, पोर्टलॅण्ड, न्यूयॉर्कसहीत अनेक ठिकाणी बायडेन आणि ट्रम्प समर्थक समोर समोर आल्याचे पाहायला मिळाले.