H-1B वीजा प्रस्ताव - ट्रम्प सरकारचा अमेरिकेतील भारतीयांना दिलासा

  अमेरिकेत राहणार्‍या विदेशी नागरिकांना आणि प्रामुख्याने भारतीयांना ट्रम्प सरकारने दिलासादायक बातमी दिली आहे.

Updated: Jan 9, 2018, 03:39 PM IST
H-1B वीजा प्रस्ताव -  ट्रम्प सरकारचा अमेरिकेतील भारतीयांना दिलासा  title=

अमेरिका :  अमेरिकेत राहणार्‍या विदेशी नागरिकांना आणि प्रामुख्याने भारतीयांना ट्रम्प सरकारने दिलासादायक बातमी दिली आहे.

एच १ बी वीजाधारकांसाठी ट्रम्प सरकारने काही गोष्टी अधिक कडक केल्या होत्या. त्यानुसआर अनेक वीजा धारकांवर अनेरिका सोडून पुन्हा मायदेशी परतावे लागणार  होते. मात्र काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्र्म्प सरकारने हा प्रस्ताव मागे घेतला आहे. 

काय होता प्रस्ताव 

एच वन बी वीजा धारकांना सहा वर्षांहून अधिक काळ राहल्यास आनि ग्रीन कार्डाची प्रतिक्षा करणार्‍यांना अमेरिका सोडावी लागणार होती. 

भारतीयांना दिलासा 

मनी कंट्रोलमध्ये छापण्यात आलेल्या अहवालानुसार अमेरिकेने एच १ बी  वीजामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मागे घेतल्यास भारतीयांसह इतर अनेक विदेशी नागरिकांना फायदा होणार आहे. 

पर्यायी मार्गाचा विचार सुरू 

अमेरिकन न्यूज एजन्सी मॅकक्लेची बातमी पाहता, वीजा नियमांमधील बदल ततपुरता टळले आहेत. यूनायटेड स्टेट्स सिटीजनशिप एंड इमिग्रेशन सर्विस इतर काही पर्यायी मार्गांचा विचार करत आहे.