सोशल मीडियाला ताब्यात ठेवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय

सोशल मीडियाशी US President Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं असणारं आंबट-गोड नातं हे काही लपून राहिलेलं नाही. 

Updated: May 29, 2020, 08:05 AM IST
सोशल मीडियाला ताब्यात ठेवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय  title=
संग्रहित छायाचित्र

वॉशिंग्टन : सोशल मीडियाशी US President Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं असणारं आंबट-गोड नातं हे काही लपून राहिलेलं नाही. याच नात्याची झलक काही दिवसांपूर्वी पाहता आली. त्याच धर्तीवर आता ट्रम्प यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. 

सोशल मीडिया कंपन्या बंद करण्याचा धमकीवजा इशारा दिल्यानंतर आता ट्रम्प यांनी समाजमाध्यमं अर्थात सोशल मीडियावर सरकाचा हस्तक्षेप वाढवण्याच्या तरतुदी असणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. 'सीएनएन'चा हवाला देत 'एएनआय' या वृत्तसंस्थेने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं. 

ओव्हल ऑफिस येथून या आदेशावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ट्रम्प यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत धोक्यात असणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि धोका कमी करण्यासाठी आपण या निर्णयावर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

वाचा : ...तर सोशल मीडिया कंपन्या बंद करु; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

दरम्यान, ट्रम्प यांचं ट्विट दिशाभूल करणारं असल्याचं म्हणण्याच्या ट्विटरवरील आरोप- प्रत्यारोपांच्या मुद्द्यावरुन या वादाला तोंड फुटलं होतं. य़ा मुद्द्यावरुन आपण न्यायालयात धाव घेण्याच्या विचारात असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सोशल मीडियावर निर्बंध आणण्याचे सरकारचे अधिकार वाढवण्याच्या आदेशावर ट्रम्प यांनी केलेली स्वाक्षरी आता प्रत्यक्षात कोणतं चित्र सर्वांपुढे ठेवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.