...तर सोशल मीडिया कंपन्या बंद करु; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

ट्रम्प असं म्हणाले कारण.... 

Updated: May 28, 2020, 09:47 AM IST
...तर सोशल मीडिया कंपन्या बंद करु; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
संग्रहित छायाचित्र

व़ॉशिंग्टन : ट्विटरकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट फॅक्टचेकअंतर्गत अधोरेकिथ केल्यानंतर सोशल मीडिया कंपन्या आणि विशेष म्हणजे ट्विटरवर त्यांचा रोष ओढावला आहे. सोशल मीडिया कंपन्यांना चांगलीच शिस्त लावण्याचा आणि तसं न झाल्यास या कंपन्या बंद करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिल्याचं म्हटलं जात आहे. 

मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांनी एकमागोमाग एक काही ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या ट्विटला फॅक्टचेक अंतर्गत अधोरेखित करत ते दिशाभूल करणारे असणं म्हणणं म्हणजे एक प्रकारे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणंच आहे, असं म्हणत ही कार्यपद्धती तातडीने बदलण्याची मागणी त्यांनी केली. 

ट्रम्प यांनी सोशल मीडिया कंपन्यांना हा इशारा दिला असला तरीही या कंपन्यांच्या भविष्याविषयीचा निर्णय घेणं हे त्यांच्या हाती नसल्याचंच प्रत्यक्षात स्पष्ट होत आहे. मुळात या कंपन्या सार्वजनिक तत्त्वांवर चालत असून त्यांच्याकडून पुरवण्यात येणाऱ्या बहुतांश सुविधांचा कोट्यवधी नागरिक उपभोग घेत आहेत. 

संपूर्ण जगभरात या सोशल मीडिया कंपन्यांचं जाळं विविध मार्गांनी पसरलं आहे. त्यामुळं ट्रम्प यांचा हा इशारा नेमका कोणत्या बळावर आहे, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. 

मुख्य म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडिया कंपन्यांना धमकावणाऱ्या ट्रम्प यांनी कोणत्याही माध्यमाचा उल्लेख करणं टाळलं. 

 

काय होतं नेमकं प्रकरण? 

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प President Donald Trump यांनी केलेल्या दोन ट्वीट्सना ट्विटरने (Twitter) दिशाभूल करणारं असल्याचं म्हणत त्यांच्या ट्विटसोबत ट्विटरने फॅक्ट चेक वॉर्किंगची लिंक लावली आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये बनावट मतपत्रिका वापरणे आणि मेल बॉक्सची चोरी होत असल्याचा दावा केला होता.