20 मिनिटांत 4 बॉटल पाणी संपवले; पोटात विष झाल्याने महिलेचा मृत्यू

अती प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने सोडियम डेफिशियन्सी होवून अमेरिकेतील महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेने 20 तासात जवळपास 2 लिटर पाण्याचे सेवन केले. 

Updated: Aug 5, 2023, 04:48 PM IST
20 मिनिटांत 4 बॉटल पाणी संपवले; पोटात विष झाल्याने महिलेचा मृत्यू  title=

Shocking News : पाणी हे शरीरासाठी खूप आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाण्याते सेवन न केल्यास डिहायड्रेशन सारखरी  समस्या निर्माण होवू शकते.  यामुळे भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन गरणे गरजेचे आहे. मात्र, याच पाण्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेने 20 मिनिटांत 4 बॉटल पाणी संपवले. मात्र, या नंतर तिच्या पोटात विष तयार झाले आणि प्रकृती बिघडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील एका महिलेसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

प्रकृती बिघडून बेशुद्ध पडली

युनिलाड नावाच्या वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  ऍशले समर्स असे मृत महिलेचे नाव आहे. ऍशले आपल्या कुटुंबासोबत मॉन्टीसेलो जवळील लेक फ्रीमन येथे सुट्टीसाठी गेली होती. याठिकाणी अचानक तिची तब्येत बिघडली. तिला अस्वस्थ वाटून चक्कर येऊ लागली. डोकेदुखी सुरु झाली. तहान लागली तसेच तिचा घसा कोरडा पडला. यामुळे काहीही विचार न करता पाणी पिण्यास सुरुवात केली.  20 मिनिटांत तिने अर्धा लिटर पाण्याच्या चार बाटल्या संपवल्या. 20 मिनीटांत तिने 2 लिटर पाणी प्यायले. मात्र, प्रकृतीत तिला फरा काही सुधारणा वाटली नाही.   संध्याकाळी घरी पोहोचल्यावर गॅरेजमध्ये पोहोचताच ती बेशुद्ध पडली. 

शरीरातील पाणी विष बनले

प्रकृती बिघडल्याने महिला बेशुद्ध पडली. तिच्या कुटुंबियांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. यावेळी तिच्या वैद्याकीय चाचण्या करण्यात आल्या. यावेळी तिच्या शरीरातील पाणी विष बनले असून तिच्या मेंदूला सुज आल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. महिलेने भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन केले. यामुळे तिच्या शरीरात पाणी होते. मात्र, या पाण्यात सोडियम नव्हते. यामुळे हेच पाणी महिलेसाठी जीवघेणे ठरले. 

सोडियम डेफिशियन्सी

यापूर्वी देखील असे अनेक प्रकार घडले आहेत. अती प्रमाणात पाणी प्यायल्याने  मिशेल फेअरबर्न नावाच्या एका टिकटॉक स्टारचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीने 12 दिवस सतत 4-4 लिटर पाणी प्यायले होते. यामुळे मिशेल याचा पाण्याचे अती सेवन केल्याने मृत्यू झाला होता. पाण्याचे अती प्रमाणात सेवन केल्यास शरीरात सोडियम डेफिशियन्सी नावाची समस्या निर्माण होते. यामुळे शरीरात सोडियमची कमतरता निर्माण होते. शरीरातील पाणी विष बनते. यामुळे पाणी पिताना देखील काळजी घेणे गरजेचे आहे.