बापरे! Valet Driver ने पार्किंग करताना अब्जाधीशाच्या दोन्ही Lamborghini ठोकल्या, त्यानंतर जे काही झालं...; पाहा VIDEO

Valet Driver Crashes Lamborghinis:  गाडी पार्क करताना Valet Driver ने अब्जाधीशाच्या दोन Lamborghini एकमेकांवर ठोकल्याची एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

Updated: Feb 11, 2023, 12:07 PM IST
बापरे! Valet Driver ने पार्किंग करताना अब्जाधीशाच्या दोन्ही Lamborghini ठोकल्या, त्यानंतर जे काही झालं...; पाहा VIDEO title=

Valet Driver Crashes Lamborghinis: चालकांसाठी अनेकदा गाडी पार्क करणं म्हणजे फार कठीण प्रसंग असतो. त्यात जर कार महागडी असेल आणि तुमची नसेल तर मग अत्यंत काळजीपूर्वक पार्किंग करताना घाम निघतो. पण जर तुमची महागडी गाडी एखाद्याने ठोकली तर काय होईल याचा विचार करा. ऑस्ट्रेलियात एका Valet Driver ने तर चक्क अब्जाधीशाची Lamborghini ठोकली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याने 1 नाही तर दोन  Lamborghini ठोकल्या. पर्थमधील Crown Resorts मध्ये पार्किंग करत असताना कर्मचाऱ्याने अब्जाधीशाच्या Lamborghini Aventador Ultimate ठोकल्या. यानंतर त्याला स्वत:लाही आपण काय करुन बसलो आहोत यावर विश्वास बसत नव्हता. 

ऑस्ट्रेलियामधील उद्योजक आणि Virtual Gaming Worlds चा संस्थापक Laurence Escalante हॉटेलच्या कसिनोमध्ये आले असता ही दुर्घटना घडली. Craig Jones यांनी दुर्घटनेनंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

व्हिडीओत Valet Driver बोलत आहे, त्यानुसार Lamborghini इतक्या वेगाने पुढे जाईल याची त्याला कल्पना नव्हती. आपण किती मोठी चूक केली आहे याची कल्पना असल्याने त्याला धक्का बसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तो म्हणत आहे की "Help, I've really f***** it up here". यावर व्हिडीओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती म्हणते की, "No way, bro, you've just f***ing ripped the c*** off" . धडक दिल्याने दोन्ही कारचे बंपर चेपले गेले होते. 

कारमधून खाली उतरल्यानंतर कर्मचारी कशाप्रकारे आपल्याकडून ही चूक झाली हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रेक आणि एक्सलेटर जवळजवळ असल्याने आपली गफलत झाल्याचं तो सांगत आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दरम्यान Laurence Escalante यांनी Crown Resorts ने चूक सुधारली असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपल्याला धडा मिळाल्याची Instagram Stoty त्यांनी टाकली होती. नंतर त्यांनी ही स्टोरी डिलीट केली.  दरम्यान Crown Resorts या घटनेची चौकशी करत आहे.