Video | आरामात रस्त्याच्या मधोमध बसला होता, कोणाची हिम्मत झाली नाही हॉर्न वाजविण्याची...

रस्त्यावर कोणी हॉर्न वाजवला नाही आणि कोणीही रस्ता खाली करण्यासाठी हंगामा केला नाही.

सुरेंद्र गांगण | Updated: Jul 12, 2019, 12:08 PM IST
Video | आरामात रस्त्याच्या मधोमध बसला होता, कोणाची हिम्मत झाली नाही हॉर्न वाजविण्याची... title=

मुंबई : रस्त्यावर एक सेकंद तरी वाहतूक कोंडी झाली तर लोक गाड्यांचे भोंगे (हॉर्न) वाजवून हैरान करतात. कोणाला थांबण्याची गरज नसते. सतत घाई असते. रस्ता खाली होण्याची कोणीही वाट पाहत नाहीत. आपल्याला बाजू देण्यासाठी किंवा रस्ता मोकळा व्हावा म्हणून सतत भोंगे वाजवून भांडावून सोडले जाते. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. रस्त्यावर आरामशीर बसलेला होता. मात्र, कोणाची हिम्मत झाली नाही हॉर्न वाजविण्याची. रस्त्यावर एक एक गाड्या येत होत्या. एकामागोमाग गाड्यांच्या रांगा लागत होत्या. रस्ता मोकळा कधी होईल, याची वाट पाहत होते सगळे. तेही शांततेत. ना कोणी हॉर्न वाजवला. ना कोणी रस्ता खाली करण्यासाठी गोंधळ घातला.

आपण वाचून हैराण झाला असाल की, रस्त्याच्यामध्ये असे कोण बसले होते. कोण होता तो माणूस? की रस्ता खाली करण्यासाठी आवाज देण्याचे धाडस कोणाला झाले नाही. हे सगळे घडले आहे ते दक्षिण आफ्रिकेतील एका मोठ्या अभ्यारण्यात. क्रुगर नॅशनल पार्क या जंगलात. येथील एका रस्त्यावर सिंहांची झुंड आरामात बसली होती. तेवढ्यात एक कार येते. दुसरी गाडी येते. एक एक करुन गाड्या येतच होत्या. रस्त्यावर ट्राफीक जॅम झाले. काही जण फोटो काढण्यात दंग झालेत. मात्र, एकाही चालकाने हॉर्न वाजवला नाही. तशी कोणाची हिम्मत झाली नाही. सगळे कसे शांततेत रस्ता मोकळा कधी होईल, त्याची वाट पाहत होते. याबाबतचा एक व्हिडिओ 'द जंगल एशिया' नावाच्या फेसबूक पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओ आपण पाहत पुढे जातो, तशी  सिंहांची संख्याही जास्त असल्याचे दिसून येत आहे. सगळेच सिंह आरामात, शांत आणि मस्त रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. काही जण मध्येच उठून चालायला लागले. वाटत होते, ते रस्ता सोडतील. पण तसं काहीही झाले नाही. एकएक करुन पुढे येत मस्तपैकी रस्त्यावर आराम करीत होते. या जंगलच्या राज्याला अनेक जण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होते. या व्हिडिओला खूप लाईक मिळत आहेत. तसेच ३.८ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.