Video : बाबो....! आज मै उपर, आसमाँ नीचे...; Burj Khalifa च्या टोकावर जाऊन 'या' महिलेची कमाल

ती इथं पोहोचली कशी? 

Updated: Aug 12, 2021, 04:21 PM IST
Video : बाबो....! आज मै उपर, आसमाँ नीचे...; Burj Khalifa च्या टोकावर जाऊन 'या' महिलेची कमाल
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'आज मै उपर, आसमाँ नीचे...', हे गाणं ऐकलंय का कधी? अर्थात ऐकलं असेलच. आणि नसेल तर आता ऐकाच. कारण, आता पुढे तुम्ही जो व्हिडीओ पाहणार आहात तो पाहिल्यानंतर तुम्हाला हेच गाणं आठवणार आहे. 

जगातील सर्वात उंच इमारतींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे बुर्ज खलिफा (Burj Khalifa). पर्यटकांपासून ते अगदी आर्किटेक्चर क्षेत्रातील तज्ज्ञांपर्यंत अनेकांसाठीच ही इमारत म्हणजे मोठ्या कुतूहलाचा विषय. या इमारतीला एकदातरी भेट देण्याचं आणि उंचावरुन सारं जग पाहण्याचं अनेकांचंच स्वप्नं. 

पर्यटनाच्या निमित्तानं हे स्वप्न साकार करण्याची संधी अनेकांना मिळते. पण, नुकतीच एका महिलेनं याहीपलीकडे जात थेट बुर्ज खलिफाचं टोक गाठलं आहे. ती तिथं नेमकी पोहोचली कशी, हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करु लागला होता. ज्यानंतर Emirates या एअरलाईन कंपनीनं काही व्हिडीओ प्रदर्शित केले. ज्यामध्ये ही हवाई सुंदरी म्हणजेच एअरहोस्टेस नेमकी तिथं कशी पोहोचली, याचा खुलासा केला आहे. 

जगातील काही प्रथितयश आणि नावाजलेल्या एअरलाईन्सपैकी एक असणाऱ्या Emiratesनं जाहिरात क्षेत्रात खऱ्या अर्थानं उंची गाठत साऱ्या जगाला थक्क केलं आहे. एअरलाईन्सचे काही गुणविषेश सांगताना ही एअरहोस्टेस तिच्या हातात असलेल्या पोस्टर्सचा वापर करतेय. ज्यानंतर जेव्हा तिच्यावर असणारा कॅमेरा झूमआऊट होतो, तेव्हा ती नेमकी कुठे उभीये हे कळतं आणि बाबोssss अशीच पाहण्याऱ्यांची प्रतिक्रिया असते. 

Emiratesनं सांगितल्यानुसार बुर्ज खलिफाच्या अगदी टोकाशी फ्लाईट अटेंडंटला उभं राहण्यासाठी अवघी 1.2 मीटर इतकीच जागा होती. जमीनीपासून तब्बल 828 मीटर इतक्या उंचीवर चित्रीत करण्यात आलेली ही जगातील पहिलीवहिली जाहिरात आहे. 

जगातील सर्वात उंच इमारत 
बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. सप्टेंबर 2004 मध्ये या इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली होती. ज्याचं उदघाटन 2010 मध्ये करण्यात आलं. या इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास 1,10,000 टन हून जास्त काँक्रिट, 5500 टनहून जास्त स्टील रेबर वापरण्यात आलं होतं. जवळपास 12000 मजुरांनी या इमारतीच्या बांधकामासाठी योगदान दिलं होतं.