OMG! चक्क कुत्रा सांगतोय भविष्य? एकदा हा व्हिडीओ पाहाच

आता जोतिष नाही तर चक्क हा कुत्रा सांगणार तुमचं भविष्य? पाहा व्हिडीओ

Updated: Oct 27, 2021, 11:08 PM IST
OMG! चक्क कुत्रा सांगतोय भविष्य? एकदा हा व्हिडीओ पाहाच title=

वॉशिंग्टन: आतापर्यंत तुम्ही जोतिष सांगणारे किंवा ऑनलाइन अॅप वगैरे पाहिले असेल. मात्र आता चक्क कुत्राच तुमच्या दिवसाचं भविष्य सांगणार आहे. वाचायला थोडं विचित्र वाटतंय ना? पण असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुत्रा चक्क तुमचा दिवस कसा जाणार हे काही सूचक गोष्टी करून सांगत आहे. या कुत्र्याचे टिकटॉकच नाही तर इन्स्टा आणि फेसबुकवरही व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. 

'नूडल' नावाचा हा कुत्र्याचे व्हिडीओ तुम्ही पाहिले का? नसतील तर आज नक्की पाहा. याचं कारण म्हणजे या नूडल नावाच्या कुत्र्याची जगभरात चर्चा सुरू आहे. अमेरिकेत राहणारा जोनथन ग्रेजिआनो (Jonathan Graziano)चा हा कुत्रा भविष्यवाणी करतो असा दावा त्याने केला आहे. तो 13 वर्षांचा असल्याचं जोनथनने सांगितलं आहे. 

जोनाथनने केलेल्या दाव्यानुसार हा कुत्रा लोकांना त्यांचा दिवस कसा असेल ते सांगतो. इंस्टाग्राम तसेच टिकटॉकवर नूडल यासाठी खूप प्रसिद्ध आहे. जोनाथनने दिलेल्या माहितीनुसार या कुत्र्याची भविष्यवाणी करण्याची पद्धत जरा वेगळी आहे. सकाळी उठल्यावर जर तो पुन्हा झोपला तर तो दिवस No Bones Day असेल. म्हणजे  त्या दिवशी लोकांनी अत्यंत काळजीपूर्वक आपली कामं करावीत. त्यांनी शक्यतो वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. भांडणापासून दूर राहावं. 

इतकंच नाही तर या दिवशी लोकांनी या दिवशी कामापुरतं काम ठेवावं. अशा एक नाही अनेक गोष्टी त्याने व्हिडीओ पोस्ट करून सांगितल्या आहेत. त्याचा हा व्हिडीओ पाहण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. त्याने सगळे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

नूडल झोप झाल्यानंतर उठून बसला किंवा चालू लागला तर तो Bones Day समजला जातो. त्या दिवशी तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील. दिवस आनंदात जाईल. दिवसातील समस्या दूर होतील. असं जोनाथनने दावा केला आहे. या सगळ्या भविष्यवाणीमुळे नूडल स्टार बनला आहे. 

बरेच लोक नूडलची भविष्यवाणी ऐकण्यासाठी त्याला फॉलो करत आहेत. जर ती खरी ठरली तर त्यांनाही आश्चर्य वाटतंच. हा दावा केवळ जोनाथनने केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झी 24 तासने या व्हिडीओची कोणतीही पुष्टी केली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Noodle (@showmenoodz)

सूचना- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची झी 24 तास कोणतीही पुष्टी करत नाही.