Viral Brain Teaser: इंटरनेटच्या उपलब्धतेमुळं एका क्लिकवर बराच पसारा तुमच्यापुढं येतो आणि तुम्हाला अनेकदा भारावून सोडतो. हे असंच का? ते तसंच का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरंही या इंटरनेटच्या माध्यमातून मिळतात. कधीकधी हेच इंटरनेट तुम्हालाच पेचात पाडतं. कसं? तेसुद्धा जाणून घ्या.
नुकतंच सोशल मीडियापासून इंटरनेटवर सर्वत्र डोक्याला ताण देणाऱ्या एका ब्रेन टीझरची बरीच चर्चा सुरु आहे. कारण, या कोड्याला सोडवण्याच्या नादात बऱ्याचजणांनी बराच वेळ दवडला, पण त्यांना योग्य उत्तर मात्र मिळालेलं नाही. काही खाण्याचे पदार्थ आणि बुटांचे जोड या व्हायरल फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्या किंमतीही तिथं दिल्या आहेत. पण, शेवटचं कोडं मात्र उमगण्यापलिकडचं आहे.
X युजर Tansu Yegen नं या कोड्याचा फोटो शेअर करत, तुम्हाला हे सोडवता येतंय का? असा प्रश्न केला आणि बस्स, मग काय? आपली हुशारी दाखवण्यासाठी बरेचजण पुढे आले. मानवी आकृती, खाण्याचे पदार्थ, बुटांचे जोड आणि बेरीज, गुणाकाराची चिन्हं पाहून हे एक गणित आहे हे सर्वांच्याच लक्षात आलं. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात शेअर करण्यात आलेल्या या पोस्टला 1.2 मिलियन व्ह्यूज मिळाले. राहिला प्रश्न उत्तराचा, तर तेसुद्धा शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.
Can you solve this pic.twitter.com/9j6ywsAIbm
— Tansu Yegen (@TansuYegen) December 24, 2023
कोणी म्हणे, 60; कोणी म्हणे 142, तर कोणी म्हणे 48... एक ना अनेक उत्तरं देत नेटकऱ्यांनी या गणिताच्या उत्तरासाठी प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतंय ? काय असेल या व्हायरल गणिताचं योग्य उत्तर? शोधा आणि इतरांनाही सांगा, वेळ जात नसेल तर हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच दिवसांनी मेंदूलाही मिळेल कमालीची चालना आणि आठवतील शाळेतले गणिताचे तास.